योगेश कथुनियाची थाळी फेकीत, तर भाला फेकीत देवेंद्र झांझरियाची ‘चांदी’

371

भारताच्या क्रीडा विश्वासाठी सोमवार सकाळपासूनच उत्साही आणि आनंदवर्धक ठरत आहे. टोकियो पॅरालिम्पिक २०२० मध्ये सकाळी नेमबाजीत जयपूरच्या अवनी लेखरा हिने सुवर्ण पदक मिळवले. त्यानंतर लागलीच थाळी फेकीत योगेश कथुनिया याने, तर भाला फेकीत देवेंद्र झांझरिया याने रौप्य पदक मिळवून विशेष कामगिरी केली. देवेंद्रच्या कामगिरीच्या माध्यमातून देशाला पॅरालिम्पिकमधील हे सहावे पदक आहे. योगेशला आठव्या वर्षी लकवा झाला होता. त्याने या व्याधीवर मात करत ही कमाई केली. थाळीफेक स्पर्धेच्या फायनलमध्ये सहाव्या आणि शेवटच्या प्रयत्नात त्याने सर्वोत्तम कामगिरीची नोंद करत सिल्व्हर मेडल पटकावले.

पंतप्रधानांनी केले कौतुक! 

योगेश कथुनिया तुमची उत्तम कामगिरी! रौप्य पदक मिळवून तुम्ही क्रीडा विश्वाचा सन्मान केला. तुमचे यश हे अथेलेटिक्ससाठी प्रोत्साहन देणारे आहे. तुमचा भावी वाटचालीसाठी शुभेच्छ!

देवेंद्रच्या झंखरिया याने भाला फेकीत रौप्य पदक मिळवले. त्याने ६४.३५ मीटरपर्यंत लांब भाला फेकला. कामगिरीच्या माध्यमातून देशाला पॅरालिम्पिकमधील हे सहावे पदक आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.