महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे जिल्हाप्रमुख अविनाश जाधव यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर आता मनसे आक्रमक झाली असून, मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी सरकारला इशारा दिला. जर ठाण्यात दहीहंडी साजरी करू दिली नाही, तर दादरमध्ये साजरी करू, असे ट्विट संदीप देशपांडे यांनी दिला.
जर ठाण्यात दही हंडी साजरी करू दिली नाही तर दादर मध्ये साजरी करू
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) August 30, 2021
मनसे दहीहंडी साजरी करण्यावर ठाम
मुख्यमंत्री फक्त हिंदू सणांवर निर्बंध घालतात. त्यापेक्षा उपाययोजना केल्या असत्या, तर बरे झाले असते, अशी टीका संदीप देशपांडे यांनी केली आहे. नारायण राणे यांची जन आशीर्वाद यात्रा असो किंवा शिवसेनेने केलेली आंदोलने असो त्यावेळी कोरोना कुठे गेला होता? शिवसैनिकांना कोरोना होत नाही का?, असा सवाल संदीप देशपांडे यांनी उपस्थित केला.
(हेही वाचा : मनसे नेते अविनाश जाधव पोलिसांच्या ताब्यात!)
खोपकर म्हणाले, आदेश साहेबांचा!
मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमय खोपकर यांनी देखील सूचक ट्विट केले आहे. ‘आदेश राजसाहेबांचा…हिंदू सण साजरे होणारच…यंदाची दहीहंडी दणक्यात, उत्सव संस्कृतीचा, सोहळा परंपरेचा. चलो ठाणे’, असे ट्विट केले आहे.
आदेश राजसाहेबांचा…
— Ameya Khopkar (@MNSAmeyaKhopkar) August 30, 2021
हिंदू सण साजरे होणारच…यंदाची दहीहंडी दणक्यात
उत्सव संस्कृतीचा, सोहळा परंपरेचा.
चलो ठाणे👍🏽
ओशिवऱ्यातही मनसेची हंडी
राज्य सरकार पाठोपाठ केंद्र सरकारने सुद्धा सण, उत्सव साजरे करू नये, असे आदेश दिले आहे. पण, तरीही मनसेने दहीहंडी उत्सव साजरा करणारच, असा पवित्रा घेतला आहे. एकीकडे ठाण्यात अविनाश जाधव यांना दहीहंडीची तयारी करत असताना अटक झाली असताना वर्सोवाचे मनसेचे विभाग संदेश देसाई हे देखील वर्सोव्यात दहीहंडी साजरी करणार आहेत.
(हेही वाचा : दहीहंडीतून मनसेची हिंदुत्वाची हाक!)
Join Our WhatsApp Community