अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी ३१ ऑगस्ट रोजी संपूर्ण सैन्य मागे घेण्याचा निर्णय घेतला होता, पण वास्तवात बायडेन यांनी ३० ऑगस्ट रोजी रात्रीच सगळे सैन्य मागे घेतले, तसेच अमेरिकन नागरिक आणि शरणार्थीना घेऊन जाणारे शेवटचे विमान काबूल विमानतळावरून उडवले. त्यानंतर मात्र धक्कादायक माहिती समोर आली आहे, कारण अफगाणिस्तानात अजून अमेरिकेचे २०० नागरिक अडकून पडले आहेत. त्यांचे काय करायचे असा प्रश्न ओबामा प्रशासनातील माजी सदस्य मार्क जोकेब यांनी विचारला आहे, त्याचे उत्तर मात्र जो बायडेन यांच्याकडे नाही.
जो बायडेन यांचा खुलासा!
सोमवारी माध्यमांशी बोलताना जो बायडेन यांनी याविषयी बोलताना जो खुलासा केला, त्याविषयी मात्र अमेरिकेत टीकेचा सूर सुरु झाला आहे. जो बायडेन याविषयी बोलताना म्हणाले कि, अमेरिकेने आतापर्यंत १ लाख २२ हजार जणांना सुरक्षितपणे अफगाणिस्तानातून बाहेर काढले आहे. जे २०० नागरिक मागे राहिले आहेत, त्यातील काही जण अमेरिकेचे ग्रीन कार्ड धारक आहेत, तर काही जण मूळ अमेरिकन वंशाचे आहेत. ही सर्व मंडळी मागे राहिलेल्या त्यांच्या कुटुंबाच्या चिंतेपोटी विमानात चढलेच नाहीत.
(हेही वाचा : अखेर राज्यपालांनी दिली भेट! ‘तो’ तिढा सुटणार का?)
तालिबानी शोध घेण्याची शक्यता!
इसिस या दहशतवादी संघटनेने दशकापूर्वी अमेरिकन आणि युरोपियन देशांच्या नागरिकांचा खुलेआम निर्दयीपणे गळा चिरून हत्या करून दहशत निर्माण केली होती, त्याची तालिबानकडून पुनरावृत्ती होण्याची भीती व्यक्त होत आहे. कारण तालिबानशी जगाने संबंध तोडले आहेत. जागतिक बँक किंवा युनोस्को यांनी अफगाणिस्तानला दिलेली मदत थांबवली आहे. त्यामुळे काही महिन्यांनी तालिबानला आर्थिक अडचण भासणार आहे, अशा वेळी पैशासाठी तालिबानी अडकलेल्या अमेरिकन नागरिकांचा धमकावण्यासाठी प्रयत्न करू शकतात. तालिबान अडकलेल्या नागरिकांना शोधून जगाकडून आर्थिक मदत मिळावी त्यासाठी या अमेरिकन नागरिकांचा धमकावण्यासाठी वापर करू शकतात, अशी शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
Join Our WhatsApp Community