१०० कोटींच्या वसुलीप्रकरणी ईडीचा ससेमिरा मागे लागलेल्या माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे जावई गौरव चतुर्वेदी याना सीबीआयने बुधवारी अचानक ताब्यात घेतले. वरळी इथल्या सुखदा इमारतीमध्ये गौरव चतुर्वेदी आले होते. त्यानंतर गौरव चतुर्वेदी बाहेर पडले असता त्यांना वरळी सी लिंक परिसरात सीबीआयने ताब्यात घेतल्याचे समजते. अनिल देशमुख यांच्या वकिलांनाही सीबीआयने ताब्यात घेतल्याची माहिती मिळत आहे. एकूण १० जणांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.
वकिलांनाही घेतले ताब्यात!
अनिल देशमुख प्रकरणात याआधी गौरव चतुर्वेदी यांचे नाव यापूर्वी कधीही आले नव्हते, आता अचानक त्यांना ताब्यात घेण्यात आल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार गौरव चतुर्वेदी हे देशमुख यांच्या वरळी इथल्या सुखदा इमारत इथे आले होते. तिथून बाहेर पडल्यानंतर वरळी परिसरातच सी-लिंक जवळ त्यांची गाडी थांबवून त्यांना ताब्यात घेण्यात आले. केंद्रीय तपास यंत्रणांनी अनिल देशमुख यांचे जावई आणि त्यांच्या वकिलांना कुठल्याही नोटीसीशिवाय उचलले, असे कळते. ‘देशात मोदीशाही चालू आहे. नियम कायदे गुंडाळले गेले आहेत. हम कहे सो कायदा आहे’, असे मोदी सरकारने अधिकृतपणे जाहीर करून टाकावे. जाहीर निषेध! असे ट्वीट करत सचिन सावंत यांनी सीबीआयच्या कारवाईवर टीका केली.
Join Our WhatsApp Communityकेंद्रीय तपास यंत्रणांनी आज अनिल देशमुख यांचे जावई आणि त्यांच्या वकिलांना कुठल्याही नोटीसीशिवाय उचलून नेले असे कळते. हे अत्यंत गंभीर आहे. "देशात मोदीशाही चालू आहे. नियम कायदे गुंडाळले गेले आहेत. हम कहे सो कायदा आहे " असे मोदी सरकारने अधिकृतपणे जाहीर करून टाकावे. जाहीर निषेध!
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) September 1, 2021