माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची सीबीआयने अगदी सुरुवातीला प्राथमिक चौकशी केलीहोती , तो अहवाल लीक झाल्याने मागील आठवड्यात खळबळ उडाली होती. आता याप्रकरणी अनिल देशमुख यांचे वकील आनंद डागा यांना अटक करण्यात आली. आता सीबीआय डागा यांना दिल्लीला घेऊन जाऊ शकते. तिथे त्यांची चौकशी होण्याची शक्यता आहे.
दिल्लीत होणार चौकशी!
हा अहवाल फुटल्यानंतर सीबीआयकडून देशमुख यांना क्लीन चीट मिळाली, अशा बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. त्यानंतर याप्रकरणी एकच खळबळ उडाली. तेव्हापासून सीबीआय ऍक्शन मोडमध्ये आली. सीबीआयने चौकशी करताच या प्रकरणी सीबीआयने चौकशी करताच पहिला संशय त्यांचेच अधिकारी अभिषेक तिवारी यांच्यावर आला आणि सीबीआयने लागलीच तिवारी याला बेड्या ठोकल्या. त्यावर सीबीआयने अनिल देशमुख यांचे वकील आनंद डागा यांच्यावर संशय घेतला आणि बुधवारी रात्री सीबीआयने थेट देशमुख यांचे जावई गौरव चतुर्वेदी आणि देशमुख यांचे वकील आनंद डागा या दोघांना ताब्यात घेतले. त्यानंतर प्राथमिक चौकशीनंतर सीबीआयने देशमुख यांचे जावई गौरव चतुर्वेदी यांना सोडले मात्र वकील डागा यांची चौकशी सुरूच ठेवली. अखेर गुरुवारी, २ सप्टेंबर रोजी सीबीआयने डागा यांना अटक अटक करण्यात आली. त्यानंतर सीबीआय डागा यांना दिल्लीला घेऊन जाऊ शकते. तिथे वकील डागा आणि सीबीआय पोलिस अभिषेक तिवारी यांची समोरासमोर चौकशी होण्याची शक्यता आहे.
(हेही वाचा : अनिल देशमुखांचे जावई सीबीआयच्या ताब्यात!)