मुंबई महापालिकेच्यावतीने दिला जाणारा आदर्श शिक्षक पुरस्कार सन २०२०-२१ अंतिम ५० शिक्षकांची नावे निश्चित करण्यात आली असून या पुरस्कारासाठी निवड झालेल्या ५० शिक्षकांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. महापौर किशोरी पेडणेकर यांनी या पुरस्कारासाठी निवड झालेल्या ५० शिक्षकांची नावे गुरुवारी पत्रकार परिषदेत जाहीर केली.
आदर्श शिक्षक महापौर पुरस्कार – सन २०२०-२१ च्या शिक्षकांची नावे जाहीर
भारताचे माजी राष्ट्रपती सर्वपल्ली डॉ. राधाकृष्णन यांचा ५ सप्टेंबर हा जन्मदिवस असल्याने त्यांची स्मृती चिरंतन रहावी म्हणून या दिवशी ‘आदर्श शिक्षक महापौर पुरस्कारा’ने शिक्षकांना सन्मानित करण्यात येते. या आदर्श शिक्षक महापौर पुरस्कार सन २०२०- २१ च्या पुरस्कार प्राप्त शिक्षकांची नावे मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी गुरुवारी स्थायी समिती सभागृह, महापालिका मुख्यालय येथे आयोजित पत्रकार परिषदेत जाहीर केली. यामध्ये मराठी माध्यमाच्या १० शिक्षकांची निवड या पुरस्कारासाठी झाली आहे. तर हिंदी आणि ऊर्दु माध्यमाच्या प्रत्येकी सहा शिक्षकांना या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. तर इंग्रजी माध्यमाच्या ५ शिक्षकांची निवड करण्यात आली. गुजराती माध्यम १, तेलगू व कन्नड १, चित्रकला, हस्तकला आणि संगीत विभागाच्या ४ शिक्षकांची यासाठी निवड झाली असून महापालिका खासगी अनुदानित आणि विना अनुदानित शाळांमधील १२ शिक्षकांना यावर्षीचा हा पुरस्कार जाहीर झाला आहे. याप्रसंगी उप महापौर अँड. सुहास वाडकर, सभागृह नेते श्रीमती विशाखा राऊत, स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव, शिक्षण समिती अध्यक्षा संध्या दोशी, स्थापत्य समिती अध्यक्ष (शहर) दत्ता पोंगडे, शिक्षणाधिकारी (प्रभारी) राजू तडवी तसेच सबंधित महापालिका अधिकारी उपस्थित होते.
५० आदर्श शिक्षकांची निवड करण्यात आली
महानगरपालिकेच्या प्राथमिक व माध्यमिक शाळा, खासगी अनुदानित शाळा व विना अनुदानित प्राथमिक शाळांतील आदर्श आणि विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी सतत व्रत स्विकारलेल्या ५० शिक्षकांना प्रत्येकी १०,००० रुपये (ECS द्वारे ) आणि मुंबई महानगरपालिका मानचिन्हाचे सोन्याचा मुलामा दिलेले पदक, प्रमाणपत्र, शाल, श्रीफळ व फेटा देऊन महापौरांच्या हस्ते सन्मानित केले जाणार आहे. सन- २०२०-२१ च्या पुरस्कारासाठी आदर्श शिक्षकांची निवड करण्याकरिता मनपा प्राथमिक व माध्यमिक शाळा, खासगी अनुदानित शाळा व विनाअनुदानित शाळांतील एकूण १३० शिक्षकांच्या मुलाखती घेऊन त्यातून ५० आदर्श शिक्षकांची निवड करण्यात आली आहे.
(हेही वाचा : सहायक आयुक्तांकडून आमदारांची पाठराखण, अभियंत्यांचे खच्चीकरण)
या शिक्षकांना पुरस्कार जाहीर
- पोपट दादाभाऊ होलगुंडे ( दिंडोशी वसाहत मनपा मराठी शाळा, गोरेगाव )
- सुजाता सुनील वळवी ( प्रतीक्षा नगर मराठी शाळा, सायन )
- संगीता अरुण झेंडे ( देवनार कॉलनी उ. प्रा. मराठी शाळा, गोवंडी )
- रेखा मंगेश कुपवडेकर ( एक्सर तळेपाखाडी मनपा मराठी शाळा, बोरिवली )
- जया विजय चिपळूणकर ( टागोरनगर मनपा उ. प्रा. मराठी शाळा )
- योगिनी यशवंत भोसले ( बर्वेनगर म. न. पा. उ.प्रा. मराठी शाळा, घाटकोपर )
- निशा नलेश साळुंके ( मालवणी टाऊनशिप मनपा मराठी शाळा, मालाड )
- अनघा सुनील आईर ( गव्हाणपाडा मनपा उ. प्रा. मराठी शाळा, मुलुंड )
- अंजला हरेश्वर पिंपळे ( गोराईगावं मनपा मराठी शाळा, बोरिवली )
- नम्रता तुकाराम गोसावी ( कुरार गावं मनपा मराठी शाळा, मालाड )
- जान्हवी जयप्रकाश संखे ( हनुमान नगर मनपा हिंदी शाळा, कांदिवली )
- रवींद्र पोपट पाटील ( संत कक्कया मार्ग मनपा हिंदी शाळा, धारावी )
- निशा धर्मेंद्रकुमार मौर्या ( हिंदू हृदय सम्राट बालासाहेब ठाकरे वेरावली हिंदी शाला, अंधेरी पूर्व )
- दुर्गाप्रसाद मिताराम हटवार ( संत कक्कया मार्ग मनपा हिंदी शाळा, धारावी )
- ईश्वरदेव रामराज पाल ( मुंबई पब्लिक स्कूल दिंडोशी वसाहत हिंदी, मालाड पूर्व )
- सारिका दीपक तांबे ( बांद्रेकरवाडी उ. प्रा. मनपा हिंदी शाळा, जोगेश्वरी )
- अब्दुल रज्जाक इकबाल अहमद ( प्रिं. वामनराव महाडिक मनपा उर्दू )
- आसिफ खान हुसैन खान ( गिलबर्ट हिल मनपा उर्दू शाळा )
- आयेशाबी मोहम्मद सिद्दीक शेख ( मोमीनपुरा मनपा उर्दू शाळा, आग्रीपाडा, मुंबई )
- तांबोळी यास्मिन अब्दुल हमीद ( कुरेशी नगर म. न. पा. उर्दू शाळा, कुर्ला पूर्व )
- मुंशी सौलेहा मुनीर अहमद ( माहीम मोरी रोड मनपा उर्दू शाळा, माहीम )
- अजरा अब्दुल रउफ खान ( संजय नगर मनपा उर्दू शाळा, गोवंडी )
- उदयसिंह बापूसाहेब नांगरे ( देवनार कॉलनी मनपा उ. प्रा. इंग्रजी शाळा, गोवंडी )
- दीपक संतोष वेखंडे ( धारावी ट्रांझिस्ट कॅम्प मनपा इंग्रजी शाळा )
- अन्सारी रुबीना याह्या ( न्यू भायखळा मनपा उ. प्रा. शाळा )
- तडवी सुजाता फिरोज ( डॉ. बाबासाहेब आंबेडकर मनपा इंग्रजी शाळा, वरळी )
- उज्ज्वला रोशन तलवारे ( राणीसती मार्ग मनपा इंग्रजी पब्लिक स्कूल )
- विनोद टाभजी बोरिचा ( कामाठीपुरा मनपा गुजराती शाळा )
- आनंद नागेश भाविकट्टी ( वाकोला मनपा उ. प्रा. कन्नड शाळा, सांताक्रूझ )
- धनश्री मनीष सावे ( मुंबई पब्लिक स्कूल पोईसर हिंदी शाळा, बोरिवली )
- चंद्रकांत भगवान साखरपेकर ( वरळी सी फेस उ. प्रा. इंग्रजी शाळा, वारळी )
- पुरेन्द्रकुमार यशवंत देवगिरकर ( भरुचा रोड मनपा उ. प्रा. हिंदी शाळा. बोरिवली )
- कुशल जगदीश वर्तक (मुंबई पब्लिक पोयसर हिंदी शाळा, बोरिवली )
- वर्षा महेश खरात (स. गो. बर्वे मार्ग विशेष शाळा, कुर्ला)
- सुजाता शेखर केळकर (कुलाबा मनपा माध्यमिक शाळा)
- अरुण शेणफळ इंगळे (मोतीलाल नगर माध्यमिक शाळा, गोरेगाव)
- गौरी राजेंद्रकुमार शिंदे (गोरेगाव पूर्व मनपा माध्यमिक विद्यालय, गोरेगाव पूर्व)
- श्रुती राजन राणे (न्यू सायन मनपा माध्यमिक शाळा, सायन)
- मनाली प्रशांत मठकर (उदयाचल प्रायमरी स्कूल विक्रोळी)
- प्रज्ञा पाटील शेनॉय (अवर लेडी प्राथमिक शाळा, चेंबूर)
- विटालीन लारा वेगस (जे.जे. अकॅडमी हाईस्कूल आणि ज्यूनि. कॉलेज. मुलुंड)
- स्पृहा सुरेश इंदू (चेंबूर एज्युकेशन सोसायटीची प्राथमिक शाळा, शिवडी, वडाळा)
- पुष्पम फ्रान्सीस (एसआयडब्लूएस प्राथमिक शाळा, शिवडी, वडाळा)
- रौनक जहाँ सिकंदर सैयद (मरोल उर्दू प्राइमरी स्कूल, अंधेरी पूर्व )
- विपीन एम सिंह (हिंदी बाल विद्यामंदिर प्राथमिक शाळा. घाटकोपर (प.) )
- नीता नितीन नागोटकर (सुविद्या प्रसारक संघांचे योजना विद्यालय. बोरिवली पूर्व.)
- प्रमोदकुमार काशिनाथ त्रिपाठी (श्री घनश्यामदास पोद्दार विद्यालय प्राथमिक विभाग )
- विशाखा विजय परब (प्रबोधन कुर्ला प्राथमिक शाळा कुर्ला प.)
- संतोष नथुराम कदम (अनुदत्त विद्यालय मराठी प्राथमिक विभाग. कांदिवली )
- दीपक महादेव गावडे (सुभेदार रामजी आंबेडकर विदयालय, दहिसर पूर्व )