राज्यात शाळा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सूतोवाच दिली होते. मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याला दुजोरा दिला नाही. शाळा सुरु करण्यासंबंधी प्रस्ताव देण्याचा अधिकार शालेय शिक्षण विभागाला आहे. मात्र त्यावर मुख्यमंत्री ठाकरे हे टास्क फोर्ससोबत चर्चा करूनच यावर निर्णय घेतील. शाळा सुरु करण्यासंबंधी २ मतप्रवाह आहे. एक मतप्रवाह आहे कि शाळा दिवाळीनंतर लगेच सुरु करावेत, तर दुसरा मतप्रवाह आहे की जेथे शून्य रुग्ण संख्या आहे, तिथे शाळा सुरु कराव्यात. मात्र असे असले तरी अंतिम निर्णय मुख्यमंत्रीच घेतील, असे पवार म्हणाले. ते पुण्याच्या दौऱ्यावर आहेत.
बारामतीच्या जमीन व्यवहाराशी दुरान्वये संबंध नाही!
राज्यात सहकाराच्या माध्यमातून बराच विकास झाला आहे, पण काही लोक चुकीचे वागले, पण म्हणून सगळेच चुकीचे वागतात, असे होत नाही. माध्यमांनीही बातम्या देताना माहिती तपासून घेणे अपेक्षित आहे. माध्यमांना आपल्या तशा स्पष्ट सूचना आहेत. बारामतीमधील खरेदीविषयीची बातमी सगळ्या माध्यमांनी चालवली, ज्याचा माझा दुरान्वये संबंध नव्हता. तसेच ईडीच्या राज्य सहकारी बँकेसंबंधी काही ठिकाणी धाडी टाकल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाला, यातही तथ्य नाही. खोट्या बातम्या देण्याचा धंदा कशाला करता? याच प्रमाणे अनिल देशमुख यांना क्लीन चीट दिल्याची बातमी दिली होती. राज्यपाल नियुक्त १२ विधान परिषद सदस्य यादीमधून राजू शेट्टी यांचे नाव वगळल्याचीही बातमी अशीच होती. माध्यमांना बातम्या देण्याचा अधिकार आहे, पण मिळालेल्या माहितीची खातरजमा करावी, अन्यथा जनतेच्या मनातून तुमची विश्वासाहर्ता कमी होईल. अशा खोट्या बातम्या देणाऱ्यांच्या मागे कायदेशीर कारवाई करण्यासाठी आपल्याकडे वेळ नाही. आम्ही सकाळी ६-७ वाजल्यापासून काम सुरु करतो, आमच्यामागे बरीच कामे आहेत, असेही अजित पवार म्हणाले. राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येत आहेत. त्यामुळे या मंदिरे हा भावनेचा मुद्दा आहे, म्हणून राजकीय पक्ष मंदिरे उघडण्यासाठी आंदोलने करत आहेत, हे यामागील सत्य आहे, असेही पवार म्हणाले.
(हेही वाचा : मंत्री आदित्य ठाकरेंनी जमवली गर्दी, गुन्हा दाखल करणार का? मनसेचा सवाल)
ग्रामीण भागात कोरोनाविषयी गांभीर्य कमी!
केंद्र सरकारनेच कोरोनाचा पार्श्वभूमीवर सध्या केरळ पहिल्या क्रमांकावर आणि महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे, त्यामुळे केंद्राने खबरदारी घेण्याची सूचना केली आहे. पण दुर्दैवाने ग्रामीण भागातील जनतेमध्ये गांभीर्य उरले नाही. काही जण बिनधास्त वावरत आहेत, नियमांचे पालन करत नाहीत. त्यामुळे ग्रामीण भागात रुग्ण संख्या वाढत आहे. तर काही जण राजकारण करत आहेत. तिसरी लाट आल्यावर पुन्हा सगळे बंद करण्याची वेळ आणू देऊ नका, असेही पवार म्हणाले.
Join Our WhatsApp Community