गणेशोत्सवाच्या काळात कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची गैरसोय होऊ नये, म्हणून आजपासून मुंबईतून कोकणात जाणासाठी ‘मोदी एक्स्प्रेस’ सुरु केली आहे. मंगळवारी, ७ सप्टेंबर रोजी पहिली मोदी एक्स्प्रेस रवाना झाली. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी गाडीला हिरवा झेंडा दाखवला. त्यावेळी भाजपचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, भाजपचे नेते, आमदार नितेश राणे आणि भाजपाचे ज्येष्ठ आमदार कालिदास कोळंबकर हे उपस्थित होते.
#modiexpress pic.twitter.com/MHEigCGrsz
— nitesh rane (@NiteshNRane) September 7, 2021
१८०० प्रवाशांनी घेतला लाभ!
मोदी एक्स्प्रेस ही गाडी दादर ते वैभववाडी, कणकवली करत सावंतवाडीला जाणार आहे. १८ डब्यांची ही गाडी आहे. या मोदी एस्क्प्रेसच्या माध्यमातून १८०० चाकरमान्यांनी याचा लाभ घेतला. मुंबई आणि महामुंबई भागातील चाकरमान्यांना यासाठी दादर रेल्वे स्थानकात यावे लागले. कारण ही ट्रेन पुढे ठाणे, पनवेल येथे थांबणार नाही. त्यावेळी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी या गाडीला दादर रेल्वे स्थानकातून हिरवा झेंडा दाखवला.
प्रवास मोफत!
विशेष म्हणजे या गाडीतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोफत प्रवास करता येणार आहे, त्यासाठी या प्रवाशांना आधीच पास देण्यात आले. ते पास असलेल्यांनाच गाडीत प्रवेश देण्यात आला. या प्रवाशांना दुपारचे जेवण देखील मोफत देण्यात येणार आहे. अशाच प्रकारे यापुढेही मोदी एक्स्प्रेस सोडण्यात येणार आहे.
Join Our WhatsApp Community