सगळी गर्दी हिंदू सणांच्या वेळीच दिसते. त्यांना त्यांच्या नातेवाइकांनी केलेली गर्दी दिसत नाही. म्हणून मंत्री नितीन राऊतांनी बाहेरच्यांना समज देण्याआधी सरकारमध्ये जे कोरोना स्प्रेडर आहेत, त्यांना आधी ताकीद द्यावी मग गणेशोत्सवात विघ्न आणावीत, असे भाजपाचे आमदार नितेश राणे म्हणाले. ते कोकणवासीयांची दादर येथील सोडण्यात आलेल्या ‘मोदी एक्स्प्रेस’ ला हिरवा कंदील दाखवण्यासाठी आले होते.
रत्नागिरीपर्यंतचा महामार्ग का रखडला?
केंद्र सरकार कोकणच्या मार्गावरील राष्ट्रीय महामार्ग बांधत असले तरी त्यावर काही भागात राज्याचेही नियंत्रण आहे. रत्नागिरीपर्यंतच्या महामार्गाची जबाबदारी ही राज्याची आहे. त्यांनी तो का पूर्ण केला नाही? सिंधुदुर्गपर्यंतचा महामार्ग आम्ही करून घेतला. आता मुंबई – गोवा महामार्गावरील खड्डे गणेशोत्सवाच्या तोंडावर बुजवण्याचे काम हाती घेतले आहे. जे आधीच केले पाहिजे होते. हे खड्डेही जांभा दगडाच्या माध्यमातून बुजवले जात आहेत, जे १-२ दिवशीही टिकणार नाही, नुसते मेक अप करण्याचे करत आहे, असे आमदार नितेश राणे म्हणाले.
कोकणात भाजपाचे आमदार वाढले तर जास्त ट्रेन सोडू!
मोदी एक्स्प्रेस ही गाडी दादर ते वैभववाडी, कणकवली करत सावंतवाडीला जाणार आहे. १८ डब्यांची ही गाडी असून १८०० प्रवासी यातून प्रवास करत आहेत. ज्यांना पासेस दिले आहेत ते गाडीत बसले आहेत. प्रत्येकाला एक वेळचे जेवण मोफत देण्यात येणार आहे. अशी सोय पहिल्यांदाच झाली आहे. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचे आभार मानतो. रत्नागिरी, सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यात मी एकटा भाजपचा आमदार आहे, बाकी सगळे शिवसेनेचे आमदार आहेत. पण जे भाजपाचा आमदार करू शकलो, ते शिवसेनेचे अन्य आमदार करू शकले नाहीत. म्हणून पुढच्या निवडणुकीत कोकणच्या जनतेने विचार करावा, भाजपाचा एक आमदार निवडून दिला, तर एक ट्रेन सोडली जाते, तसे आणखी आमदार निवडून दिले, तर किती ट्रेन सोडल्या जातील, याचा विचार करावा, असेही आमदार राणे म्हणाले.
Join Our WhatsApp Community