बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचा जोर अद्यापही कायम असून, याचा परिणाम म्हणून बुधवारी, ९ सप्टेंबरला कोकण, मध्य महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रातील बहुतांशी जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर मुंबईलगतच्या पालघर जिल्ह्याला रेड अलर्ट देण्यात आला आहे.
९ सप्टेंबरनंतर पावसाचे विघ्न दूर होणार!
भारतीय हवामान शास्त्र विभागाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांच्याकडील माहितीनुसार, कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या काही भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. कोकणात काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता आहे. ९ सप्टेंबरपासून मात्र पावसाचा मारा कमी होईल. बुधवारी पालघर जिल्ह्याला रेड अलर्ट देण्यात आला असून, मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, पुणे, नाशिक, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर किनारी भागात सोसाट्याचा वारा वाहील. शिवाय घाट भागातदेखील तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होईल, अशी शक्यता देखील हवामान खात्याने वर्तविली आहे.
गणपती बाप्पा मोरया🌸 & Weather:
राज्यात सध्या असलेला जोरदार पावसाच्या सिस्टिमची, 9 सप्टेंबर पासून तिव्रता कमी होण्याची शक्यता IMD ने आज वर्तवली आहे.त्यामुळे गणेश चतुर्थीला,बाप्पाच्या आगमनासाठी,भावीकांना अडचण नसेल.अधिक माहितीसाठी हवामान विभागाची वेबसाईट पहा@CMOMaharashtra pic.twitter.com/ZRYovBgSfD— K S Hosalikar (@Hosalikar_KS) September 7, 2021
(हेही वाचा : तालिबान्यांचे सरकार स्थापन! तालिबानी – हक्कानी यांच्यात तणाव कायम?)
मुंबईत मंगळवारी रात्रीपासून पावसाला जोर
मंगळवारी दिवसभर लपंडाव खेळणाऱ्या पावसाने रात्री मात्र मुंबईकरांना गाठलेच. रात्री आठच्या सुमारास मुंबईत बहुतांश ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पडलेल्या पावसाने काही क्षण का होईना मुंबईकरांना धडकी भरविली. बुधवारी देखील मुंबईत पावसाचा मारा असाच कायम राहणार असून, ९ सप्टेंबरनंतर पावसाचा जोर ओसरणार आहे. मंगळवारी पहाटे पावसाने किंचित हजेरी लावली. नऊ वाजेपर्यंत बहुतांश ठिकाणी पाऊस अक्षरश: कोसळला. साडे नऊ वाजेपर्यंत पाऊस कोसळत असतानाच विजांचा कडकडाटदेखील सुरु होता.
Join Our WhatsApp Community📢Nowcast warning issued at 21:15hrs 7 Sept:
Intense to very intense spells of rain very likely to occur at isol places in districts of #Mumbai,#Thane during next 3-4hrs.Possibility of thunder/lightning 🌩with gusty winds in sm areas. Tk precautions while moving out.
-IMD MUMBAI pic.twitter.com/YJUk6uFNKV— K S Hosalikar (@Hosalikar_KS) September 7, 2021