अफगाणिस्तानचे नवे मंत्रिमंडळ दहशतवादीच! कोणता मंत्री किती मोठा दहशतवादी?

तालिबानचा पंतप्रधान मुल्ला हसन अखुंद हा सध्या पंतप्रधान बनला आहे. २० वर्षांपूर्वी तालिबानच्या सरकारमध्ये तो परराष्ट्रमंत्री होता. सध्या त्याचे नाव संयुक्त राष्ट्र संघाच्या दहशतवाद्यांच्या यादीत समाविष्ट केलेले आहे.

157

अफगाणिस्तानात तालिबान्यांची राजवट आल्यावर त्याठिकाणी नव्या मंत्रिमंडळाची स्थापना करण्यात आली, त्याची घोषणा करण्यात आल्यावर मंत्रिमंडळातील मंत्र्यांच्या कुंडल्या बाहेर येऊ लागल्या. दहशतवादाच्या जोरावर कब्जा केलेल्या अफगाणिस्तानवर ज्या तालिबान्यांनी स्वतःचे सरकार स्थापन केले, त्या सरकारमधील बहुतांश मंत्री दहशतवादीच असल्याचे समोर आले आहे.

पंतप्रधान संयुक्त राष्ट्र संघाच्या यादीतील दहशतवादी! 

तालिबानचा पंतप्रधान मुल्ला हसन अखुंद हा सध्या पंतप्रधान बनला आहे. २० वर्षांपूर्वी तालिबानच्या सरकारमध्ये तो परराष्ट्रमंत्री होता. सध्या त्याचे नाव संयुक्त राष्ट्र संघाच्या दहशतवाद्यांच्या यादीत  समाविष्ट केलेले आहे. गेली वीस वर्ष तो तालिबानसाठी कार्यरत आहे. अखूंद हा धार्मिक नेता म्हणून जास्त परिचित आहे.

उपपंतप्रधान तालिबानचा संस्थापक!

मुल्ला अब्दूल गनी बरादर हा तालिबानच्या राजकीय विंगचा प्रमुख आहे. तालिबानची ज्यावेळेस चर्चा होते, तेव्हा मुल्ला अब्दूल गनी बरादरचे नाव चर्चेत असते. सोव्हिएत यूनियनने अफगाणिस्तानमधून माघार घेतली आणि अस्थिरता, गोंधळ, भ्रष्टाचाराच्या वातावरणात  मुल्ला ओमर आणि मुल्ला अब्दूल गनी बरादरने तालिबानची स्थापना केली. २०१० साली मुल्ला अब्दूल गनी बरादरला पाकिस्तानच्या कराचीत अटक करण्यात आली होती आणि २०१८ मध्ये त्याची सुटका केली गेली.

दुसरा उपपंतप्रधान कट्टर धार्मिक नेता! 

अब्दूल सलाम हनाफी हा दुसरा उपपंतप्रधान आहे. हनाफीचीही ओळख कट्टर धार्मिक नेता म्हणूनच आहे. वेगवेगळ्या मदरशांमध्ये त्याचे शिक्षण झालेले आहे. तालिबानच्या सुरुवातीपासूनच हनाफी जोडला गेलेला आहे. हनाफीची ओळख आलीम ए दिन म्हणजे मौलवी अशी आहे.

गृहमंत्र्यावर ५ मिलियन डॉलरचे बक्षीस!  

अफगाणिस्तानचा नवा गृहमंत्री सिराजुद्दीन हक्कानी आहे. सिराजुद्दीन हक्कानी यूएनच्या लिस्टमध्ये जागतिक दहशतवादी म्हणून आहे. विशेष म्हणजे सिराजुद्दीन हक्कानीच्या डोक्यावर अमेरीकेने ५ मिलियन डॉलरचे बक्षीस लावले आहे. अमेरीकेच्यादृष्टीने सिराजुद्दीन हक्कानी फरार आहे. २००८ मध्ये काबूलच्या हॉटेलमध्ये बॉम्बस्फोट झाला होता. त्यात सहा जणांचा बळी गेला होता. त्यात काही अमेरीकनही होते. ते सिराजुद्दीन हक्कानीनेच घडवल्याचा आरोप आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.