गणेशोत्सवात मुंबईत लागू होणार जमावबंदी… मुंबई पोलिसांचे आदेश नक्की वाचा

गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशी पर्यंत हे निर्बंध मुंबईत लागू राहणार आहेत.

163

शुक्रवारपासून सुरू होणा-या गणेशात्सवादरम्यान राज्यात कोविडच्या तिस-या लाटेचा धोका वर्तवण्यात येत आहे. यामुळे मुंबई पोलिसांनी कडक पावले उचलली असून, मुंबईत कलम 144 लागू करण्याचे आदेश दिले आहेत. 10 सप्टेंबर ते 19 सप्टेंबर 2021 दरम्यान 144 अंतर्गत मुंबईत जमावबंदी लागू करण्यात आली आहे. या आदेशांचे उल्लंघन करणा-या व्यक्तींवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असेही मुंबई पोलिसांनी आपल्या आदेशात म्हटले आहे.

(हेही वाचाः घरगुती गणेशमूर्तींच्या आगमन, विसर्जनासाठी महापालिकेची नियमावली जाहीर)

काय आहे आदेश?

10 सप्टेंबर ते 19 सप्टेंबर या कालावधीत सार्वजनिक ठिकाणी 5 पेक्षा जास्त व्यक्तींना एकत्रित जमण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच कुठल्याही प्रकारच्या मिरवणुकीवर सुद्धा बंदी घालण्यात आली आहे. या आदेशांचे उल्लंघन करणा-यांवर कडक कारवाई करण्यात येईल असेही मुंबई पोलिसांनी आपल्या आदेशात स्पष्ट केले आहे. गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशी पर्यंत हे निर्बंध मुंबईत लागू राहणार आहेत.

(हेही वाचाः यंदा गणेश दर्शन ऑनलाईनच! नवस फेडू इच्छिणाऱ्या गणेशभक्तांचे काय? )

फक्त ऑनलाईन दर्शन

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व सार्वजनिक गणेश मंडळांना ऑनलाईन दर्शनाची सुविधा उपलब्ध करुन द्यावी, असे निर्देश राज्य सरकारकडून देण्यात आले आहेत. कोणालाही मुखदर्शन किंवा प्रत्यक्ष मंडपात येऊन दर्शन घेण्यास राज्य सरकारकडून सक्त मनाई करण्यात आली आहे. त्यामुळे गणेशोत्सवादरम्यान गर्दी होणार नाही याची काळजी गणेश मंडळांनी घ्यावी, असे आदेश मंडळांना देण्यात आले आहेत.

WhatsApp Image 2021 09 09 at 4.05.49 PM

(हेही वाचाः लॉकडाऊनमध्ये बियर-बार सुरू ठेवण्यासाठी असे होते वाझेचे ‘रेटकार्ड’)

सार्वजनिक गणेशोत्सव २०२१ मार्गदर्शक सूचना

  • कोविड – 19 मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता या वर्षीचा गणेशोत्सव साध्या पध्दतीने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याअनुषंगाने खालीलप्रमाणे मार्गदर्शक सूचना करण्यात आल्या आहेत.
  • सार्वजनिक गणेशोत्सवासाठी गणेशोत्सव मंडळांनी महापालिका/स्थानिक प्रशासन यांची त्यांचे धोरणानुसार पूर्व परवानगी घेणे आवश्यक आहे.
  • मंडपाबाबतच्या धोरणानुसार मर्यादित स्वरुपाचे मंडप उभारण्यात यावेत. या वर्षीचा गणेशोत्सव साध्या पध्दतीने साजरा करणे अपेक्षित आहे.
  • श्रीगणेशाची मुर्ती सार्वजनिक मंडळांकरिता ४ फूट व घरगुती गणपतीकरिता २ फुटांच्या मर्यादेत असावी.
  • या वर्षी शक्यतो पारंपरिक गणेशमूर्तीऐवजी घरातील धातू / संगमरवर आदी मूर्तीचे पूजन करावे. मूर्ती शाडूची/ पर्यावरणपूरक असल्यास त्याचे विसर्जन घरच्या घरी करावे. विसर्जन घरी करणे शक्य नसल्यास नजिकच्या कृत्रीम विसर्जनस्थळी विसर्जन करण्यात यावे.
  • उत्सवाकरिता वर्गणी/देणगी स्वेच्छेने दिल्यास त्यांचा स्वीकार करावा. जाहिरातींच्या प्रदर्शनामुळे गर्दी आकर्षित होणार नाही असे पहावे. तसेच आरोग्य विषयक व सामाजिक संदेश असलेल्या जाहिराती प्रदर्शित करण्यास पसंती देण्यात यावी.
  • सांस्कृतिक कार्यक्रमांऐवजी आरोग्य विषयक उपक्रम/ शिबीरे (उदा.  रक्तदान आयोजित करण्यास प्राधान्य देण्यात यावे आणि त्याद्वारे कोरोना, मलेरिया, डेंग्यू इ. आजार आणि त्यांचे प्रतिबंधात्मक उपाय तसेच जनजागृती करण्यात यावी.)
  • श्रीगणेशाचे दर्शनाची सुविधा ऑनलाईन, केवल नेटवर्क, वेबसाईट, फेसबुक इत्यादीद्वारे उपलब्ध करून देण्याबाबत जास्तीत जास्त व्यवस्था करण्यात यावी.
  • श्रींच्या आगमन व विसर्जन मिरवणूक काढण्यात येऊ नयेत. विसर्जनाच्या पारंपरिक पध्दतीत विसर्जन स्थळी होणारी आरती घरीच करून विसर्जन स्थळी कमीत कमी वेळ रहावी.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.