१०० कोटी वसुलीच्या आरोप प्रकरणी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात ईडीने ५ समन्स बजावूनही देशमुख त्याविरोधात विविध न्यायालयात धाव घेत संरक्षण मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून देशमुख यांनी ईडीच्या समन्स विरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली, त्यावेळी न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे यांच्या एक सदस्यीय खंडपीठाने सुनावणी घेण्यास नकार दिला, त्यानंतर यावर न्यायमूर्ती न्यायमूर्ती संदीप शिंदे या एक सदस्यीय खंडपीठासमोर सुनावणीला आली असता त्यावर सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी यावर एक सदस्य खंडपीठ सुनावणी घेऊ, असे म्हटल्यावर न्यायालयाने यावर १३ सप्टेंबर रोजी निर्णय घेण्याचा निर्णय घेतला.
यावेळी सॉलिसिटर जनरल तुषार मेहता सुनावणी दरम्यान म्हणाले, रजिस्टार विभागाने स्वतः तसा उल्लेख केला आहे. या याचिकेवर एक सदस्यीय खंडपीठ सुनावणी घेण्यास सक्षम नाही, त्यासाठी दोन सदस्यीय खंडपीठासामोर सुनावणी करण्यात यावी, असे म्हटले आहे. त्यामुळे यावर सुनावणी घेता येणार नाही, असे मेहता म्हणाले. याला मात्र अनिल देशमुख यांचे वकील विक्रम चौधरी आणि अनिकेत निकम यांनी याला विरोध केला. या याचिकेवर एक सदस्यीय खंडपीठ सुनावणी घेण्यास सक्षम आहे, असे म्हटले. त्यावर न्यायमूर्ती संदीप शिंदे यांनी यावर आपण सोमवारी, १३ सप्टेंबर रोजी निर्णय घेऊ, असे सांगितले.
(हेही वाचा : राणेंच्या पत्नी आणि मुलाविरोधात लूकआऊट सर्क्युलर… काय आहे प्रकरण?)
देशमुख यांना दिसताक्षणी अटक करण्याचा आदेश!
अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटींच्या वसुलीचा आरोप झाल्यावर न्यायालयाने देशमुख यांची सीबीआयने चौकशी करण्याचा आदेश दिला. त्याप्रमाणे सीबीआयने चौकशी सुरु केली, त्यानंतर या प्रकरणी ईडीनेही चौकशी सुरु केली. त्यासाठी ईडीने सलग ५ वेळा समन्स पाठवले, मात्र प्रत्येक वेळी देशमुख त्याला गैरहजर राहिले आहेत. त्यामुळे अखेर ईडीने देशमुख यांना दिसत क्षणी अटक करण्याचा आदेश दिला आहे.
Join Our WhatsApp Community