मुंबईत रुग्णसंख्येला उतरती कळा… चाचण्या वाढूनही कोरोनाचा ताप उतरला

बुधवारी वाढलेल्या रुग्ण संख्येनंतर पुढील दोन दिवसांमध्ये घटलेली संख्या ही तिसऱ्या लाटेचा प्रभाव नसल्याचा संकेत असावा, असेही बोलले जात आहे.

119

मुंबईतील कोविड रुग्णांची संख्या पाचशे पार गेलेली असताना, पुन्हा एकदा रुग्णांचा आकडा खाली सरकत चालला आहे. दोन दिवसांपूर्वी बुधवारी दिवसभरात ५३० नवीन रुग्ण आढळून आले होते, त्यानंतर गुरुवारी ही रुग्णसंख्या ४५८ एवढी होती. तर शुक्रवारी दिवसभरात मुंबईत ४४१ नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर सक्रीय रुग्णांची आकडेवारी वाढलेली आहे. बुधवारपर्यंत मुंबईत ३ हजार ८९५ रुग्णांवर विविध ठिकाणी जंबो कोविड सेंटर आणि रुग्णालयांमध्ये उपचार सुरू होते, ती संख्या शुक्रवारी साडेचार हजारांवर जाऊन पोहोचली आहे.

(हेही वाचाः मुंबईकरांचा ऑक्सिजन पॉवरफुल… तिस-या लाटेसाठी अशी आहे महापालिकेची तयारी)

तिस-या लाटेचा प्रभाव नसल्याचे संकेत

मागील बुधवारी दिवसभरात केलेल्या ४८ हजार ५२१ कोविड चाचण्यांमध्ये ५३० नवीन रुग्ण आढळून आले होते. तर गुरुवारी ४८ हजार ७१२ कोविड चाचण्या करण्यात आल्यानंतर, ४५८ नवीन रुग्ण आढळून आले होते. तर शुक्रवारी यापेक्षा अधिक म्हणजे ४९ हजार ९२१ कोविड चाचण्या करण्यात आल्या, यामध्ये ४४१ रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे मागील दोन दिवसांमध्ये कोविड चाचण्या वाढवल्यानंतरही रुग्णांची संख्या साडेचारशेच्या आसपासच राहिल्यामुळे, मुंबईकरांसाठी ही समाधानाची गोष्ट आहे. टास्क फोर्समधील तज्ज्ञांच्या मते १० सप्टेंबरपर्यंत रुग्णांची संख्या न वाढल्यास मुंबईतील धोका कमी होईल. त्यामुळे बुधवारी वाढलेल्या रुग्ण संख्येनंतर पुढील दोन दिवसांमध्ये घटलेली संख्या ही तिसऱ्या लाटेचा प्रभाव नसल्याचा संकेत असावा, असेही बोलले जात आहे.

अशी आहे संख्या

शुक्रवारी दिवसभरात १७५ रुग्ण बरे होऊन घरी परतले आणि ५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या मृत्यू झालेल्या रुग्णांपैकी सर्व जण दीर्घकालीन आजारी होते. यामध्ये २ पुरुष आणि ३ महिला रुग्णांचा समावेश होता. दोन रुग्णांचे वय हे साठीपार आहेत, तर उर्वरित तीन रुग्ण हे ४० ते ६० वयोगटातील आहेत. रुग्ण बरे झालेल्या रुग्णांचा दर हा ९७ टक्के आहे, मुंबईतील रुग्ण दुप्पटीचा दर हा १ हजार १९१ दिवस एवढा आहे. झोपडपट्ट्या आणि चाळी या पुन्हा कोरोनामुक्त झाल्या आहेत. दिवसभरात एकही नवीन झोपडपट्टी, चाळीची नोंद सक्रीय कंटेन्मेंट झोनमध्ये झाली नसून, ही संख्या शून्यावर आली आहे. तर शुक्रवारी सीलबंद असलेल्या इमारतींची संख्या ४४ एवढी होती.

(हेही वाचाः रक्तसाठा असूनही रक्त देण्यास टाळाटाळ! रक्तपेढ्यांचा अमानवी कारभार)

मागील दोन आठवड्यांतील रुग्ण संख्या आणि मृत्यूचा आकडा

शुक्रवारी १० सप्टेंबर २०२१ : रुग्ण- ४४१, मृत्यू -५

गुरुवारी ९ सप्टेंबर २०२१ : रुग्ण- ४५८, मृत्यू-६

बुधवार ८ सप्टेंबर २०२१ : रुग्ण- ५३०, मृत्यू -४

मंगळवार ७ सप्टेंबर २०२१ : रुग्ण- ३५३, मृत्यू -२

सोमवार ६ सप्टेंबर २०२१ : रुग्ण- ३७९, मृत्यू -५

शनिवारी ५ सप्टेंबर २०२१ : रुग्ण- ४९६, मृत्यू -२

रविवारी ४ सप्टेंबर २०२१ : रुग्ण- ४१६, मृत्यू -४

सोमवारी ३ सप्टेंबर २०२१ : रुग्ण- ४२२, मृत्यू -३

मंगळवारी २ सप्टेंबर २०२१ : रुग्ण- ४४१, मृत्यू -३

बुधवार १ सप्टेंबर २०२१ : रुग्ण- ४१६, मृत्यू -४

मंगळवार ३१ ऑगस्ट २०२१ : रुग्ण- ३२३, मृत्यू -१

सोमवार ३० ऑगस्ट २०२१ : रुग्ण -३३४, मृत्यू -२

रविवार २९ ऑगस्ट २०२१ : रुग्ण -३४५, मृत्यू -२

शनिवार २८ ऑगस्ट २०२१ : रुग्ण -३८८, मृत्यू -४

शुक्रवार २७ ऑगस्ट २०२१: रुग्ण -३६४, मृत्यू -५

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.