गणेशोत्सवाच्या राज्यात नवीन कोरोना रुग्ण संख्या ५ हजाराच्या पुढे गेली, सक्रिय रुग्ण संख्या ५० हजारांच्या पुढे गेली. त्यामुळे राज्याची चिंता वाढली होती, मात्र गणेशोत्सव सुरु झाल्याबरोबर अचानक कोरोना रुग्ण संख्येत घेत होऊ लागली. गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवशी नवीन रुग्ण संख्या ५ हजाराच्या खाली आणि दुसऱ्या दिवशी ही संख्या ३ हजारापर्यंत खाली घसरली आहे.
३५ जणांचा मृत्यू झाला
गणेशोत्सव काळात कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी सर्वच स्तरावर प्रयत्न होताना दिसून येत आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. म्हणून महाराष्ट्रात त्याचे चांगले परिमाण दिसू लागले आहेत. राज्यात नव्या रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे, तसेच कोरोना मृतांचा आकडाही कमी झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राज्यात शनिवारी, ११ सप्टेंबर रोजी कोरोनाचे ३ हजार ७५ नवे रुग्ण आढळून आले आहेत. शनिवारी ३ हजार ५६ लोक बरे झाले आहेत. तर ३५ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोरोनाग्रस्तांची संख्या ६४ लाख ९४ हजार २५४ पोहोचली असून कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा ४९ हजार ७९६ वर पोहोचला आहे. तब्बल ६३ लाख लोकांनी कोरोनावर मात केली आहे. ६३ लाख २ हजार ८१६ रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर १६ हजार ६७२ जणांवर उपचार सुरू आहेत.
(हेही वाचा : कोविड रुग्ण संख्येची उलटी गिनती सुरु! कशी ते वाचा…)
Join Our WhatsApp Community