उत्तर प्रदेशमध्ये 403 जागांवर निवडणूक लढवण्याची घोषणा शिवसेनेने केली होती. मात्र अवघ्या 24 तासांत शिवसेनेने यू-टर्न घेतला असून, उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत शिवसेना फक्त 100 जागा लढवणार आहे. उत्तर प्रदेशमध्ये निवडणूक लढवण्याची शिवसेनेची ही पहिलीच वेळ नसून, याआधी 2017 साली देखील शिवसेनेने उत्तर प्रदेशमध्ये आपले उमेदवार उभे केले होते. पण त्या निवडणुकीमध्ये देखील शिवसेनेचा सुफडा साफ झाला होता.
सेनेला मिळाली होती इतकी मतं
२०१७च्या निवडणुकीत उत्तर प्रदेशात एकूण ८ कोटी ६७ लाख २८ हजार ३२४ लोकांनी मतदान केले होते. यात १ टक्के मतदानही शिवसेनेला झाले नाही. २०१७ मध्ये शिवसेनेच्या ५७ उमेदवारांना मिळून एकूण ८८ हजार ५९५ मते मिळाली होती. या ५७ जागांपैकी ४३ मतदारसंघ असे होते जिथे शिवसेनेला सर्वाधिक कमी मतदान झाले. तर काही जागा अशा होत्या ज्याठिकाणी शिवसेनेच्या उमेदवाराला २०० मतेही मिळाली नाहीत. अनेक जागांवर शिवसेनेच्या उमेदवाराला नोटापेक्षाही कमी मतदान झाले.
(हेही वाचाः शिवसेनेचा यू-टर्न! आता किती जागा लढणार?)
यूपीतही आघाडीचा प्रयोग
उत्तर प्रदेशातही काही शेतकरी संघटना आहेत. या संघटना आमच्यासोबत यायला तयार आहेत. खासकरुन पश्चिमी उत्तर प्रदेशमधील शेतकरी संघटनांनी आम्हाला पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशातही आघाडीचा प्रयोग होऊ शकतो, असे राऊत यांनी सांगितले. त्यामुळे उत्तर प्रदेशात शिवसेना कुणासोबत आघाडीचा प्रयोग करणार, हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.
(हेही वाचाः शिवसेना आता योगींना टक्कर देणार! पण राज्याबाहेर शिवसेनेची ‘ही’ अवस्था)
Join Our WhatsApp Community