गेल्या काही महिन्यांपासून भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना सळो की पळो करून सोडलेले असताना आता किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडीच्या आणखी एका मंत्र्यांचे नाव घेतले आहे. किरीट सोमय्या यांनी राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रफ यांच्यावर मनी लाँड्रिंगचे आरोप केले असून, मुश्रीफांच्या कुटुंबाने बेनामी संपत्ती गोळा केल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे. एवढेच नाही तर किरिट सोमय्या यांनी २७०० पानांचे पुरावेचे इन्कम टॅक्सला दिले आहेत.
(हेही वाचा : धक्कादायक! ओबीसी आरक्षणाशिवायच होणार निवडणुका!)
२७०० पानी पुरावे…!
मी राज्य सरकारमधील ११ भ्रष्टाचारी मंत्र्यांची यादी जाहीर केली होती. पण दुर्दैवाने ११ जणांच्या टीममध्ये राखीव खेळाडूंची संख्या वाढायला लागली आहे. हसन मुश्रीफ यांचं नाव राखीव खेळाडूंमध्ये आम्ही वाढवत आहोत. हसन मुश्रीफ परिवाराने शेकडो कोटींचे घोटाळे केले आहेत. बोगस कंपन्या, शेल कंपन्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणार आर्थिक गैरव्यवहार, बेनामी संपत्ती केल्याचे माझ्याकडे २७०० पानांचे पुरावे आहेत. ते मी आयकर विभागाला सोपवल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे बोगस कंपन्या दाखवून हसन मुश्रीफ कुटुंबियांनी पैसे लाटले. सीआरएम सिस्टम प्रा. लि ही कंपनी प्रवीण अग्रवाल ऑपरेटर आहेत. यामध्ये हसन मुश्रीफ यांचे सुपुत्र नाविद मुश्रीफ यांनी 2 कोटीचं कर्ज घेतले आहे. ही कंपनी शेल कंपनी/बोगस कंपनी आहे. नाविद मुश्रीफ यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात दाखवले आहे. त्यामध्ये जी रक्कम दाखवली आहे, 2 कोटीहून जास्त रक्कम दाखवल्याचे सोमय्या म्हणालेत. तसेच बाप-बेटे दोघांचे १२७ कोटींचे पुरावे आमच्याकडे असल्याचे सोमय्या म्हणालेत. हसन मुश्रीफ यांनी पत्नी सायरा हसन मुश्रीफ यांच्या अकाऊंटमध्ये सरसेनापती संताजी धनाजी घोरपडे साखर कारखान्याचे तीन लाख रुपयांचे शेअर्स दाखवले आहे. 2018- 19 मध्ये इन्कम टॅक्सने मुश्रीफांच्या घरावर धाडी टाकल्या होत्या. बेनामी ट्राझॅक्शन 127 कोटींचे व्यवहार समोर आले आहेत.
उद्या मी मुंबई इडीकडे अधिकृत तक्रार करणार आहे. 2700 पानांचे पुरावे देणार आहे. माझ्याकडे 2 मंत्र्यांचे फाईल तयार होते, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे दोन मंत्री होते, त्यापैकी एकाचे प्रकरण आज मी सांगितल्याचे सोमय्या म्हणालेत.
सोमय्या ईडीकडे करणार तक्रार
सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे किरीट सोमय्या मंगळावारी ईडीकडे अधिकृत तक्रार करणार असून, २७०० पानांचे पुरावे देणार आहेत. परवा दिल्लीला अर्थविभाग, ईडी, कंपनी मंत्रालय इथे देखील हे पुरावे मी सादर करणार आहे. ठाकरे सरकारच्या डर्टी घोटाळा ११ मध्ये राखीव खेळाडूंची भरती चालूच राहणार आहे. माझ्याकडे २ मंत्र्यांच्या फाईल तयार होत्या. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना. आज एनसीपीच्या एका मंत्र्याचा घोटाळा उघड केला आहे. काही दिवसांनी शिवसेनेच्या मंत्र्यांचा देखील घोटाळा उघड करू असा इशारा किरीट सोमय्या यांनी दिला आहे.