गुजरात मॉडेलपेक्षा मुंबई मॉडेलवर बोला… सामनातील अग्रलेखावर नितेश राणेंची टीका

तुम्ही तुमच्या मुंबई मॉडेलवर बोलून जनतेच्या प्रश्नांची उत्तर द्या, असे देखील नितेश राणे म्हणाले.

148

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी अग्रलेख लिहून गुजरातच्या बदललेल्या मुख्यमंत्र्यांवरुन भाजपवर टीका केली. यावरुन आता भाजप आमदार नितेश राणे यांनी शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे. आमच्या गुजरात मॉडेलवर बोलण्यापेक्षा मुंबई मॉडेलवर बोला, अशी टीका नितेश राणे यांनी केली आहे.

जनतेच्या प्रश्नांची उत्तरे द्या

गुजरातचा मुख्यमंत्री का बदलला? हा आमच्या पक्षाचा विषय आहे. आमच्या गुजरात मॉडेलवर बोलण्यापेक्षा तुम्ही मुंबई मॉडेलवर बोला ना. तुम्ही भर कोरोनाकाळात आयुक्त परदेशी यांची बदली का केली?, असा सवाल नितेश राणे यांनी उपस्थित केला आहे. मुंबई मॉडेलमध्ये इतके मृत्यू झालेले आहेत. तुम्ही तुमच्या मुंबई मॉडेलवर बोलून जनतेच्या प्रश्नांची उत्तर द्या, असे देखील नितेश राणे म्हणाले.

(हेही वाचाः मोडकळीस येताच शरद पवारांनी काँग्रेसची माडी सोडली! रावसाहेब दानवेंचा घणाघात)

काय आहे आजचा अग्रलेख

गुजरात राज्य जर विकास, प्रगतीच्या मार्गावर पुढे जात होते तर मग अशा पद्धतीने रातोरात मुख्यमंत्री बदलायची वेळ का आली?, असा सवाल सामना अग्रलेखातून विचारण्यात आला आहे. कुठे काय बदलायचे हा त्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे. भाकरी ही फिरवावीच लागते, पण एखादे राज्य जेव्हा विकास किंवा प्रगतीचे ‘मॉडेल’ असल्याचे आदळआपट करत सांगितले जाते, तेथे अचानक नेतृत्वबदल घडवला की मग लोकांच्या मनात शंका निर्माण होतात, असे अग्रलेखात म्हटले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.