राज्यात प्रचंड मोठ्या प्रमाणात वीज बिल थकबाकी वाढत आहे, ही थकबाकी आता तब्बल ६३ हजार कोटींवर जाऊन पोहचली आहे, थकबाकी जर अशीच वाढत गेली तर मात्र महावितरणच्या कार्यालयाला टाळे ठोकण्याची वेळ येईल. तसे होऊ नये म्हणून आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तातडीने मंगळवारी, १४ सप्टेंबर रोजी ऊर्जा खात्याची बैठक बोलावली आहे. त्यावर वीज थकबाकी कशी वाढली आणि वसुलीसाठी कोणते पर्याय आहेत, यावर या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.
लॉकडाऊनच्या काळात ८ हजाराची थकबाकी वाढली!
दरम्यान १ एप्रिल २०२० ते ३० ऑक्टोबर या दरम्यान बरीच वीज थकबाकी वाढली, यामुळे थकबाकीच्या आकडेवारीत तब्बल ८ हजार कोटींची भर पडली आहे. तत्कालीन ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ‘शेतकऱ्यांनी वीज भरले नाही तरी कृषिपंप बंद करणार नाही’, असा निर्णय घेतला, त्यामुळे १० हजार कोटींची थकबाकी ४० हजारांपर्यंत पोहचली.
(हेही वाचा : काँग्रेसचा खोडसाळपणा! वीर सावरकरांचा पुन्हा केला अवमान!)
अशी आहे थकबाकी!
- औद्योगिक क्षेत्र – २,९१७ कोटी
- वाणिज्य – ८२२ कोटी
- सार्वजनिक पाणीपुरवठा – २,२५८ कोटी
- कृषि – ३९, १५७ कोटी
- घरगुती – ३,२६४ कोटी
- पथदिवे ६,२७१ कोटी
- सार्वजनिक सेवा – २३५ कोटी