नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया आणि तेलंगणाचे माहिती, तंत्रज्ञान मंत्री के.टी. रामराव यांनी शनिवारी पहिला मेडिसिन फ्रॉम द स्काय प्रोजेक्ट लॉन्च केला. ज्याचा उद्देश ड्रोनच्या माध्यमातून दुर्गम भागात लस आणि इतर आवश्यक उत्पादनं पोहोचवणे हा आहे. यामध्ये मारुत ड्रोन आणि पब्लिक हेल्थ फाउंडेशन ऑफ इंडिया, हेलीकॉप्टर, ब्लू डार्ट मेड एक्स्प्रेस, ब्लू डार्ट आणि स्काय एअर यांचा समावेश आहे. टेकएगलसह क्यूरिस फ्लायने शनिवारी त्यांचे ड्रोन लाँच केले. .
प्रायोगिक तत्वावरील उपक्रम
मेडिसिन फ्रॉम द स्काय हा प्रकल्प तेलंगणातील 16 ग्रीन झोनमध्ये प्रायोगिक तत्वावर घेण्यात येणार आहे. यामध्ये तयार करण्यात येणा-या डेटाच्या आधारावर हा प्रकल्प राष्ट्रीय स्तरावर वाढवण्यात येईल, असे सिंधिया यांनी सांगितले. मेडिसिन फ्रॉम द स्काय प्रोजेक्ट हा तेलंगणातील जागतिक आर्थिक मंच, नीती आयोग आणि अपोलो हॉस्पिटलच्या हेल्थनेट ग्लोबल यांच्या भागीदारीतून साकारण्यात आलेला एक उपक्रम आहे.
Union Minister for @MoCA_GoI @JM_Scindia along with Ministers @KTRTRS and @SabithaindraTRS launched #MedicinefromtheSky project in Vikarabad today. MP @DrRanjithReddy, MLC @SurabhiVaniDevi, MLAs Methuku Anand, @kale_yadaiah, @PNReddyTRS , Maheshwar Reddy were present. pic.twitter.com/8ajvM0e25B
— Minister for IT, Industries, MA & UD, Telangana (@MinisterKTR) September 11, 2021
आव्हानांना तोंड देण्यासाठी उपयोग होणार
भारतात प्राथमिक आरोग्य केंद्रांची संख्या ग्रामीण व दुर्गम भागात खूप कमी आहे. देशातील अनेक भागांत प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि उपकेंद्रे ही डोंगराळ, जंगल किंवा नदी क्षेत्रात आहेत. मुसळधार पाऊस आणि भूस्खलनामुळे वर्षातील अनेक महिने ही केंद्रे रस्त्यांपासून तुटली जातात. बर्फाळ प्रदेशात देखील हवामानाच्या समस्यांमुळे आरोग्य सुविधा पोहोचवणे कठीण होते. त्यामुळे या भागांत कोविड-19 लसीकरण करणे आव्हानात्मक आहे. त्यामुळे अशा भागातील हवामानाच्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी हेलिकॉप्टर ड्रोन तयार करण्यात आल्याचे मारुत ड्रोनेटेकचे संस्थापक प्रेमकुमार विस्लावाथ यांनी सांगितले. माहिती व तंत्रज्ञान मंत्री के.टी. रामराव म्हणाले की, हा प्रकल्प तंत्रज्ञान आणि आरोग्य सेवेचा एक महत्वाचा बिंदू आहे आणि नवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात राज्य आघाडीवर आहे.
Join Our WhatsApp Community