भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर हे कायम राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि पवार कुटुंबाला लक्ष्य करत असतात, त्याप्रमाणे त्यांनी पुन्हा एकदा पवार कुटुंबाला लक्ष्य केले आहे. त्यासंबंधी त्यांनी ट्विट केले आहे. त्यामध्ये त्यांनी ‘काका-पुतण्याची टोळी…’ असा शब्द प्रयोग करून शरद पवार आणि अजित अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.
काय म्हटले आहे पडळकर यांनी ट्विटमध्ये?
आम्ही सर्वोच्च न्यायालयाचे आभारी आहोत, कारण श्री मल्हारी मार्तंड खंडोबाच्या भक्तांना पंरपरागत मिळालेल्या देवस्थानच्या जमिनी ‘काका-पुतण्याच्या’ टोळीने ‘मुळशी पॅटर्नद्वारे’ कब्जा मारलेली ११३ एकर जमिन मोकळी केली. आता लवकरच यांचे पितळ जगापुढे उघडे पडणार आहे. ।।यळकोट यळकोट जय मल्हार।।
आम्ही सर्वोच्च न्यायालयाचे आभारी आहोत,कारण श्री मल्हारी मार्तंड खंडोबाच्या भक्तांना पंरपरागत मिळालेल्या देवस्थानच्या जमिनी ‘काका-पुतण्याच्या’ टोळीने ‘#मुळशी_पॅटर्नद्वारे’ कब्जा मारलेली ११३ एकर जमिन मोकळी केली. आता लवकरच यांचे पितळ जगापुढे उघडे पडणार आहे.
।।यळकोट यळकोट जय मल्हार।। pic.twitter.com/ACt32JGySh— Gopichand Padalkar (@GopichandP_MLC) September 15, 2021
(हेही वाचा : अबब! देशात ८० हजार कोटी रुपयांची रक्कम ‘बेवारस’!)
पुन्हा जेजुरी गड!
काही महिन्यांपूर्वी जेजुरी गडावर जेजुरी देवस्थानने उभारलेल्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळा अनावरणावरुनही आमदार पडळकर यांनी मोठा वाद घातला होता. खंडेरायाच्या जेजुरी गडावर जेजुरी देवस्थानने उभारलेल्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्याचे अनावरण शरद पवार आणि छत्रपती संभाजीराजे यांच्या उपस्थितीत होणार होते. मात्र, उद्घाटनादिवशीच अचानक पहाटे गोपीचंद पडळकर त्यांच्या कार्यकर्त्यांसह जेजुरी गडावर पोहचले आणि त्यांनी अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्याचे उद्घाटन केले होते. त्यानंतर, आता जेजुरी मंदिर देवस्थानच्या जमिनीसंदर्भात सर्वोच्च न्यायलयाच्या निर्णयाचे आभार मानत त्यांनी पुन्हा एकदा पवार कुटुंबीयांवर हल्लाबोल केल्याचे दिसून आले. पडळकर यांनी कुणाचेही नाव घेतले नाही, मात्र अप्रत्यक्षपणे पवार कुटुंबावर निशाणा साधला आहे.
Join Our WhatsApp Community