जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षादलासोबत झालेल्या दोन वेग-वेगळ्या चकमकीत लश्कर-ए-तोयबाच्या एका प्रमुखासह तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. एक दहशतवादी शपियांमध्ये मारला गेला. तर दोन दहशतवाद्यांना कुपवाडामध्ये झालेल्या चकमकीत मारण्यात आलं.
#UPDATE Two unidentified terrorists killed in an encounter with security forces in Ganipora Kralgund area of Handwara district. A search is still going on: Jammu and Kashmir Police https://t.co/5B17ti5B1C
— ANI (@ANI) August 19, 2020
पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, शोपियांच्या चित्रगाम गावात दहशतवादी लपले असल्याची माहिती मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे सुरक्षादलाने त्या भागात घेराबंदी आणि शोधमोहिम सुरु केली होती. यावेळी दहशतवाद्यांकडून गोळीबार करण्यात आला आणि त्यानंतर चकमक सुरु झाली. त्यात एका दहशतवाद्याचा खात्मा झाला. चकमक झालेल्या ठिकाणाहून पिस्तुल, हँड ग्रेनेड्स सापडले असून ते नष्ट करण्यात आले आहेत.
The terrorist, who has been killed in an encounter in Handwara, has been identified as Lashkar-e-Taiba commander Naseer-u-din Lone. He was involved in killing of 3 CRPF jawans in Sopore on April 18 & 3 CRPF jawans in Handwara on May 4: Jammu & Kashmir IGP Vijay Kumar (file pic) pic.twitter.com/EKNMC0v3oi
— ANI (@ANI) August 19, 2020
याचदरम्यान, दुसरीकडे उत्तर काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यात दहशतवादी आणि सुरक्षादलामध्ये चकमक झाली. यात दोन दहशतवाद्यांना ठार करण्यात आलं. काश्मीरचे पोलिस महानिरीक्षक विजय कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, ठार झालेल्या दहशतवाद्यापैकी एक 18 एप्रिल रोजी सोपोरमध्ये झालेल्या सीआरपीएफच्या तीन जवानांच्या हत्येत सामिल होता. तर 4 मे रोजी हंदवाडामध्ये सीआरपीएफच्या 3 जवानांची हत्या झाली होती. त्यातही तो सामिल होता.
Join Our WhatsApp Community