हुश्श्य! कोविड चाचण्या वाढल्या, तरी रुग्ण संख्या घटलेलीच!

मुंबईतील रुग्ण बरे झालेल्या रुग्णांचा दर हा ९७ टक्के एवढा असून झोपडपट्टी व चाळींच्या सक्रिय कंटेन्मेंटची संख्या ही शुन्यावरच आहे.

159

बुधवारी कोविड चाचण्यांची संख्या कमी असतानाही रुग्ण संख्या वाढलेली पहायला मिळाली, मात्र गुरुवारी हे चित्र जरा वेगळे पहायला मिळाले. गुरुवारी दिवसभरात ४४ हजार ६४९ कोविड चाचण्या करण्यात आल्यानंतर ४४६ नवीन रुग्ण आढळून आले. बुधवारी दिवसभरात २९ हजार ८८६ कोविड चाचण्या करण्यात आल्यानंतर तब्बल ५१४ नवीन रुग्ण आढळून आले होते. त्यामुळे बुधवारी वाढलेल्या रुग्ण संख्येचा आकडा गुरुवारी चाचण्यांची संख्या वाढल्यानंतर पुन्हा रुग्ण संख्या कमी झाल्याची पहायला मिळाली. त्यामुळे काही प्रमाणात वाढलेली चिंता आता दूर झाल्यासारखी वाटत आहे.

रुग्ण बरे झालेल्या रुग्णांचा दर ९७ टक्के 

गुरुवारी ४४६ नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर ४३१ बाधित रुग्ण बरे होवून घरी परतले आहेत. मृत पावलेल्या २ रुग्णांपैकी सर्वच रुग्णांना दीर्घकालीन आजार होते. हे दोन्ही रुग्ण पुरुष होते. तर मुंबईतील रुग्ण बरे झालेल्या रुग्णांचा दर हा ९७ टक्के एवढा असून झोपडपट्टी व चाळींच्या सक्रिय कंटेन्मेंटची संख्या ही शुन्यावरच आहे. सक्रिय सीलबंद इमारतींची संख्या ही ३९ एवढी आहे.

(हेही वाचा : शिल्पा म्हणाली, कुंद्राची कंपनी माहीत, पण त्याचे ‘उद्योग’ नाही!)

मागील ९ दिवसांमधील रुग्ण संख्या, चाचण्या आणि मृत्यूचा आकडा

  • गुरुवार, १६ सप्टेंबर २०२१ : रुग्ण- ४४६ (चाचण्या : ४४,६४९), मृत्यू – २
  • बुधवार, १५ सप्टेंबर २०२१ :  रुग्ण – ५१४ (चाचण्या : २९, ८८६), मृत्यू – ४
  • मंगळवार, १४ सप्टेंबर २०२१ :  रुग्ण- ३६७ (चाचण्या : २८, ४९८), मृत्यू – ५
  • सोमवार, १३ सप्टेंबर २०२१ :  रुग्ण – ३४७ (चाचण्या : २५, ५८१), मृत्यू – ६
  • रविवार, १२ सप्टेंबर २०२१ :  रुग्ण – ३५४ (चाचण्या :  २९,८४९), मृत्यू – ७
  • शनिवार, ११ सप्टेंबर २०२१ :  रुग्ण- ३६५ (चाचण्या :  ३५,८५१), मृत्यू – ४
  • शुक्रवार, १० सप्टेंबर २०२१ :  रुग्ण- ४४१ (चाचण्या : ४९,९२१), मृत्यू – ५
  • गुरुवार, ९ सप्टेंबर  २०२१ : रुग्ण – ४५८ ( चाचण्या :  ४८,७१२), मृत्यू – ६
  • बुधवार, ८ सप्टेंबर २०२१ :  रुग्ण – ५३० (चाचण्या : ४८,५२१), मृत्यू – ४
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.