कॅप्टन अमरिंदर सिंहांची ‘लढाई’ तून माघार!

पंजाबमध्ये एकीकडे विधानसभा निवडणुकीची मोर्चेबांधणी होत असताना, काँग्रेसमध्ये उभी फूट पडली आहे.

130

कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी ‘आपण अपमान सहन करत काँग्रेसमध्ये राहू शकत नाही’, असे सांगत पंजाबच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा शनिवारी राज्यपालांकडे सोपवला. त्यांच्या विरोधात मोठ्या प्रमाणात कुरघोड्या सुरु होत्या, त्यामुळे कंटाळून कॅप्टन सिंह यांनी राजीनामा देत त्यांच्या बाजूने संघर्ष थांबवला आहे. त्यामुळे आता काँग्रेसकडून पंजाबमध्ये कुणाची मुख्यमंत्री पदी निवड करण्यात येणार आहे, हे लवकरच पाहायला मिळणार आहे.

कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी, ‘सोनिया गांधी आणि राहुल गांधी हे आपल्याला भेट देत नाही, आपल्याशी संवाद साधत नाही. आपल्याला वाळीत टाकण्यात आले आहे, हा अपमान आपण सहन करत काँग्रेसमध्ये राहू शकत नाही’, असे म्हणाले होते. त्यामुळे आता विधीमंडळ पक्षाच्या बैठकीत, ज्यांच्या बाजूने बहुमत असेल, ते राज्याचा कारभार स्वीकारतील, असे काँग्रेस हायकमांडने ठरवले आहे. पंजाबमध्ये मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत सुनील जाखड, सुखजिंदर रंधवा आणि प्रताप सिंह बाजवा यांची नावे आघाडीवर आहेत. अमरिंदर सिंह यांनी सोनिया गांधी यांच्याशी फोनवर चर्चा केली. यावेळी त्यांच्या झालेल्या अपमानाबद्दल नाराजी व्यक्त केली.

(हेही वाचा : मुख्यमंत्र्यांचे ‘ते’ वक्तव्य आणि आघाडीत बिघाडी!)

काय घडले पंजाबमध्ये? 

पंजाबमध्ये एकीकडे विधानसभा निवडणुकीची मोर्चेबांधणी होत असताना, काँग्रेसमध्ये उभी फूट पडली आहे. पंजाब काँग्रेस दोन गटात विभागली आहे. एक गट नवज्योत सिद्धू यांचा तर दुसरा कॅप्टन अमरिंदर सिंह यांचा आहे. अमरिंदर सिंह यांना मुख्यमंत्रिपदावरुन हटवण्याची मागणी केली जात होती. त्यांच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत अनेक आमदारांनी आवाज उठवण्यात आला होता. हे प्रकरण इतकं वाढलं होतं की काँग्रेसच्या केंद्रीय समितीला हस्तक्षेप करावा लागला. पंजाब काँग्रेसमध्ये दुफळी निर्माण झाली आहे. त्यामुळे हायकमांडने या 25 आमदार आणि मंत्र्यांना दिल्लीत बोलावलं होतं. या सर्व आमदारांशी काँग्रेसच्या तीन सदस्यांच्या पॅनलने चर्चा केली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.