मुंबईत दिवसभरात ४८५ नवीन रुग्ण

रुग्ण बरे झालेल्या रुग्णांचा दर हा ९७ टक्के आहे.

139

शुक्रवारी जिथे ४० हजार ४४३ कोविड चाचण्या करण्यात आल्यानंतर ४३४ नवीन रुग्ण आढळून आले होते, तिथे शनिवारी ४१ हजार १४ कोविड चाचण्या करण्यात आल्यानंतर ४८५ नवीन रुग्ण आढळून आले. शनिवारी दिवसभरात ६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

रुग्ण बरे झालेल्या रुग्णांचा दर हा ९७ टक्के

शनिवारी ४८५ नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर ४३२ बाधित रुग्ण बरे होवून घरी परतले आहेत. मृत पावलेल्या ६ रुग्णांपैकी ४ रुग्णांना दीर्घकालीन आजार होते. यामध्ये २ रुग्ण पुरुष होते. ४ महिला रुग्णांचा समावेश होता. तर मुंबईतील रुग्ण बरे झालेल्या रुग्णांचा दर हा ९७ टक्के एवढा असून रुग्ण दुपटीचा दर हा १२७६ दिवस एवढा आहे. झोपडपट्टी व चाळींच्या सक्रिय कंटेन्मेंटची संख्या ही शुन्यावरच आहे. सक्रिय सीलबंद इमारतींची संख्या ही ४२ एवढी आहे.

मागील ११ दिवसांमधील रुग्ण संख्या, चाचण्या आणि मृत्यूचा आकडा

शनिवार १८ सप्टेंबर २०२१ : रुग्ण- ४८५(चाचण्या : ४१,०१४), मृत्यू -६

शुक्रवार १७ सप्टेंबर २०२१ : रुग्ण- ४३४(चाचण्या : ४०,४४३), मृत्यू -३

गुरुवार १६ सप्टेंबर २०२१ : रुग्ण- ४४६(चाचण्या : ४४,६४९), मृत्यू -२

बुधवार १५ सप्टेंबर २०२१ : रुग्ण- ५१४ (चाचण्या : २९, ८८६), मृत्यू -४

मंगळवार १४ सप्टेंबर २०२१ : रुग्ण- ३६७ (चाचण्या : २८, ४९८), मृत्यू -५

सोमवार १३ सप्टेंबर २०२१ : रुग्ण- ३४७ (चाचण्या : २५, ५८१), मृत्यू -६

रविवार १२ सप्टेंबर २०२१ : रुग्ण- ३५४(चाचण्या : २९,८४९), मृत्यू -७

शनिवार ११ सप्टेंबर २०२१ : रुग्ण- ३६५ (चाचण्या : ३५,८५१), मृत्यू -४

शुक्रवार १० सप्टेंबर २०२१ : रुग्ण- ४४१ (चाचण्या :४९,९२१), मृत्यू -५

गुरुवार ९ सप्टेंबर २०२१ : रुग्ण- ४५८(चाचण्या : ४८,७१२), मृत्यू-६

बुधवार ८ सप्टेंबर २०२१ : रुग्ण- ५३०(चाचण्या : ४८,५२१), मृत्यू -४

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.