राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घालण्यात आलेले निर्बंध आता काही प्रमाणात शिथिल करण्यात आले आहेत. यामध्ये खेळाची मैदाने, व्यायामशाळा इत्यादी ठराविक वेळेत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. असे असताना सुद्धा दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज मैदानासमोरील महात्मा गांधी जलतरणतलाव अजूनही खुला करण्यात आलेला नाही. यामुळे येथील नागरिक नाराज असून, तरणतलाव सुरू करण्यासाठी सर्वांनी एकमुखी मागणी केली आहे. नागरिकांच्या तक्रारी लक्षात घेऊन मनसेचे वरळी विधानसभा अध्यक्ष संतोष धुरी यांनी मुंबई महापालिका उपायुक्तांना पत्र लिहीत हा तरणतलाव सुरू करण्याची मागणी केली आहे.
लसींचे दोन्ही डोस घेतलेल्या सर्व नागरिकांसाठी हा तरणतलाव सुरू करण्यात यावा, अशी आग्रही मागणी करणारे पत्र मनसेतर्फे मुंबई महापालिकेला देण्यात आले आहे.
खाजगीकरण करण्याचा कट?
मागील कोविडच्या लाटेनंतर ज्यावेळी निर्बंध शिथिल करण्यात आले होते त्यावेळेस महात्मा गांधी तरणतलाव सुद्धा राज्यस्तरीय खेळाडूंसाठी खुला करण्यात आला होता. पण आता इतर ठिकाणचे निर्बंध हटवल्यानंतर देखील हा तरणतलाव अद्याप बंदच आहे. या तरणतलावाचे सुद्धा अंधेरी-मुलुंड येथील तरणतलावाप्रमाणे खाजगीकरण करण्याचा कट शिजत आहे का, असा संभ्रम नागरिकांमध्ये निर्माण झाल्याचे या पत्रात म्हटले आहे.
आज सकाळी महात्मा गांधी तरण तलाव येथे दादर,माहीम, प्रभादेवी, वरळी येथील सर्व नागरिकांनी तरण तलाव चालू करण्याची मागणी केली. pic.twitter.com/GHdbhg6lnu
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) September 19, 2021
त्यामुळे नागरिकांच्या विनंतीस अग्रक्रम देऊन हा तरणतलाव लसींचे दोन्ही डेस घेतलेल्यांसाठी लवकरात लवकर सुरू करण्यात यावा, अशी विनंती संतोष धुरी यांनी या पत्राद्वारे केली आहे.
Join Our WhatsApp Communityमहात्मा गांधी जलतरण तलाव सुरू करण्याकरीता सर्व नागरिकांची एकमुखी मागणी. pic.twitter.com/0Gz5SCIg9M
— Santosh Dhuri (@SantoshDhuri19) September 19, 2021