भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्या विरोधात संतापलेल्या परिवहन मंत्री अनिल परब यांनी मुंबई उच्च न्यायालयात १०० कोटींची अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे. किरीट सोमय्या यांनी आपली बदनामी आणि मानहानी केल्याबद्दल त्यांना कायदेशीर नोटीस देऊन ७२ तासांत माफी मागण्याचे सूचित केले होते. परंतु, त्यांनी माफी मागितली नसल्याने सोमय्या यांच्या विरोधात दावा दाखल केला आहे, असे परब यांनी जाहीर केले आहे.
मंत्री परब यांच्यावर बेनामी संपत्तीचा आरोप होता!
सोमय्या जाहीरपणे आपली वारंवार बदनामी करत असल्याचे अनिल परब यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सचिन वाझे याच्या माध्यमातून, माजी मृहमंत्री अनिल देशमुख यांनी संजीव पलांडे यांच्या, तर परिवहन मंत्री अनिल परब यांनी बजरंग खरमाटे या अधिकाऱ्याच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची बेनामी संपत्ती गोळा केली आहे, असा आरोप भाजपचे नेते, माजी खासदार किरीट सोमय्या यांनी येथे केला. किरीट सोमय्या यांनी अनिल परब यांच्यावर दहा वेगवेगळ्या घोटाळ्यांची चौकशी सुरू असल्याचा आरोप केले आहे. एसटी महामंडळ तिकीट घोटाळा, म्हाडाची जमीन लंपास करणे, दापोलीला अनधिकृत १० कोटींचा रिसॉर्ट बांधणे, आरटीओ ट्रान्सफर घोटाळा, सचिन वाझेचे मुंबई महापालिका कॉन्ट्रॅक्टर घोटाळा, भेंडी बाजारमधील मोठा री-डेव्हलपमेंट प्रकल्प ५० कोटींचा घोटाळा अशा अनेक चौकशी अनिल परब यांच्या विरोधात सुरू असल्याचा दावा सोमय्या यांनी केला होता.
(हेही वाचा : राज्यात महिला सुरक्षित? गेल्या काही दिवसांत घडल्या ‘इतक्या’ बलात्काराच्या घटना)
Join Our WhatsApp Community