पावसाळ्यातील ऋतुमानानुसार सध्या पाऊस कोसळत नाही. सप्टेंबरमध्येही पाऊस मुसळधार कोसळत आहे. त्यामुळे मात्र त्याचा थेट परिणाम शेतीवर होऊ लागला आहे. लहरी पावसामुळे पालेभाज्या आणि फळभाज्या यांच्या शेतीवर परिणाम झाला आहे. त्यामुळे भाज्यांची आवक घटली आहे. म्हणून त्याचा थेट फटका हा पितृपक्षाला बसणार आहे. सध्या लहरी पाऊस, इंधन दरवाढ आणि पितृपक्ष असा सर्वच बाजूने भाज्यांच्या बाजारावर परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे भाज्यांचे दर कडाडले आहेत. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच मागणी पेक्षा अधिक भाजीपाल्याची आवक बाजारात होती, त्यामुळे साहजिकच भाज्यांचे दर घसरले होते. शेतकऱ्यांनी मिळेल त्या दरात भाज्यांची विक्री केली. घाऊक बाजारांमध्ये कवडीमोल दर मिळाल्याने टोमॅटो, ढोबळी मिरची शेतकऱ्यांनी रस्त्यावर फेकून नाराजी व्यक्त केली होती.
भाज्यांचे दर तिप्पट-चौपट वाढले!
त्यामुळे शेतकऱ्यांनीही भाज्यांची लागवड मर्यादित सस्वरूपात केली. त्यामुळे भाजीपाला लागवडीवर लक्षणीय परिणाम झाला. पुरेशी लागवड न झाल्याने गेल्या काही दिवसांपासून भाज्यांची आवक कमालीची घटली आहे. त्यातच आता पितृपक्षाला सुरुवात झाली आहे.. त्यामुळे बाजारात पालेभाज्या आणि फळभाज्या यांची मागणी वाढली आहे. त्यामुळे त्यांचे दर गगनाला भिडले आहेत. वाशी येथील ‘एपीएमसी’च्या भाजीपाला बाजारात आवक कमी झाली. बाजारात रोजच्या सुमारे ६०० गाड्यांऐवजी ४८४ गाड्या भाज्यांची आवक झाली असून, आधी प्रतिकिलो १० ते २० रुपयांनी मिळत असलेल्या भाज्या आता २० ते ३० रुपये प्रतिकिलो दर झाला आहे. घाऊक बाजारात वाढ झाल्याने या सर्व भाज्या किरकोळीत दुप्पट ते तिप्पट दराने विकल्या जात आहे. इंधन दरवाढीमुळे वाहतूक खचार्त वाढ झाल्याने ही दरवाढ करण्याशिवाय पयार्य नसल्याचे किरकोळ विक्रेत्यांचे म्हणणे आहे.
(हेही वाचा : नगरसेवक हरीश भांदिर्गे यांना अटक होणार?)
भाज्या घाऊक आधीचे दर नवीन दर
- भेंडी 10-12 32-34
- फरसबी 15-20 40-60
- वाटाणा 40-65 80-100
- दुधी 15-20 25-30
- हिरवी मिरची 10-15 25-30