पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत पोहोचले आहेत. पंतप्रधान एअर इंडिया वनच्या विशेष उड्डाणातून भारताहून अमेरिकेला गेले. 23 सप्टेंबर रोजी भारतीय वेळेनुसार पहाटे 4 वाजता मोदी अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टनला पोहोचले.
पंतप्रधान मोदी 22 सप्टेंबर रोजी सकाळी अमेरिकेला रवाना झाल्यानंतर त्यांनी स्वतःचा विमानात बसलेला एक फोटो ट्विट केला. ज्यात ते काही कागदपत्रे आणि फाईल्स चाळताना दिसत आहेत. लांबचा हवाई प्रवास म्हणजेच काम करण्याची योग्य संधी असे म्हणत त्यांनी हा फोटो ट्वीट केला आहे.
A long flight also means opportunities to go through papers and some file work. pic.twitter.com/nYoSjO6gIB
— Narendra Modi (@narendramodi) September 22, 2021
मार्चमध्ये 14-क्वाड देशांची वर्चुअल बैठक झाली होती, परंतु आता या नेत्यांना प्रत्यक्ष भेटण्याची संधी मिळत आहे. यावेळी मार्च बैठकीच्या निकालाचा आढावा घेतला जाईल. इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील परिस्थितीवरही चर्चा केली जाईल. पंतप्रधानांनी 22 सप्टेंबर रोजी सांगितले होते की, त्यांच्या अमेरिका दौऱ्यामुळे त्या देशासोबत धोरणात्मक भागीदारी मजबूत होईल आणि जापान आणि ऑस्ट्रेलिया सारख्या देशांशी संबंध नवी उंची गाठतील. जो बायडन राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर पंतप्रधान मोदींचा हा पहिला अमेरिका दौरा आहे.
Join Our WhatsApp Community