महाराष्ट्रातील मनोज गुंजल ठरला राष्ट्रीय सेवा पुरस्काराचा मानकरी

146

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी शुक्रवारी राष्ट्रपती भवनातून 2019-20 वर्षासाठी राष्ट्रीय सेवा योजना (NSS) पुरस्कार प्रदान केले. नवी दिल्लीतील सुषमा स्वराज भवन येथून राष्ट्रपती या कार्यक्रमाला व्हर्च्युअली उपस्थित होते.
यावर्षीचा राष्ट्रीय सेवा योजना पुरस्कार महाराष्ट्रातील मनोज विष्णू गुंजल या विद्यार्थ्याला देण्यात आला आहे.

मनोजची उल्लेखनीय कामगिरी

प्रा. रामकृष्ण मोरे कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, आकुर्डी, पुणे या महाविद्यालातील विद्यार्थी मनोज विष्णू गुंजल या एनएसएस स्वयंसेवकाला 2019-20 वर्षासाठी राष्ट्रीय सेवा योजना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डसाठी आयोजित केलेल्या वृक्षारोपण स्पर्धेतही तो सहभागी झाला होता. मनोजने रक्तदान शिबिरे, प्रधानमंत्री जन धन योजना, प्रधानमंत्री जीवन विमा योजना, उज्ज्वला योजना, प्रौढ साक्षरता, वृक्षारोपण आणि ब्लूज दान शिबिरे यांत सक्रियपणे सहभाग घेतला होता. तसेच, राज्य एनएसएस सेलद्वारे आयोजित हिवाळी शिबिरे, आपत्ती व्यवस्थापनासाठी उत्कर्ष आव्हान शिबिरांमध्येही भाग घेतला होता.

का दिला जातो पुरस्कार?

स्वयंसेवी समुदाय सेवेद्वारे विद्यार्थी युवकांचे व्यक्तिमत्व आणि चारित्र्य विकसित करण्याच्या प्राथमिक उद्देशाने 1969 मध्ये एनएसएसची सुरुवात करण्यात आली. हा पुरस्कार 42 लोकांना प्रदान करण्यात आला. याव्यतिरिक्त, हे पुरस्कार विद्यापीठ +2 कौन्सिल, एनएसएस युनिट्स आणि त्यांचे कार्यक्रम अधिकारी आणि एनएसएस स्वयंसेवकांसारख्या तीन वेगवेगळ्या श्रेणींमध्ये दिले गेले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.