आता मुंबई दिसणार थ्रीडी…

यामुळे थ्रीडी मॅपींग असणा-या शहरांमध्ये आता मुंबईचा समावेश झाला आहे.

189

मुंबई शहरासाठी थ्रीडी नकाशा बनवण्यात आला आहे. आता थ्रीडी नकाशाच्या सहाय्याने चित्रांसह वॅार्डची एका क्लिकवर माहिती उपलब्ध होणार आहे. मुंबईतील हा पहिला थ्रीडी प्रकल्प असून, वरळी शहरातून या प्रकल्पाची सुरुवात करण्यात आली आहे. यामुळे थ्रीडी मॅपिंग असणा-या शहरांमध्ये आता मुंबईचा समावेश झाला असून, मुंबईकरांच्या दृष्टीने ही अभिमानाची बाब आहे.

सुरुवातीला 10 चौरस किलोमीटर क्षेत्रासाठी हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. मुंबई महापालिकेच्या या महत्वाकांक्षी प्रकल्पाचे उद्घाटन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले.

(हेही वाचाः हे माहीत आहे का? तुमच्या ‘परफ्युम’ मध्ये आहे व्हेल माशाची ‘उलटी’)

आदित्य ठाकरेंनी केल्या होत्या सूचना

मुंबईची वाढती लोकसंख्या आणि विस्तारित भौगोलिक परिसर यांमुळे मुलभूत नागरी सेवा-सुविधा पुरवणे, पायाभूत सुविधांची निर्मिती करणे कठीण आहे. त्यामुळे परिसराचे थ्रीडी मॅपिंग करण्याच्या सूचना आदित्य ठाकरे यांनी केल्या होत्या. त्याची सुरुवात म्हणून वरळी परिसराचा सुमारे 10 चौरस किलोमीटर क्षेत्रफळाचा थ्रीडी नकाशा तयार केला आहे. महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांच्या मार्गदर्शनाखाली, जी/दक्षिण विभागाचे सहायक आयुक्त आणि माहिती व तंत्रज्ञान संचालक शरद उघडे यांनी हा प्रकल्प पूर्णत्वास नेला.

(हेही वाचाः घट बसणार, मंदिरे उघडणार! राज्य सरकारचा मोठा निर्णय)

रिअल टाईमनुसार घेता येणार निर्णय

यासंदर्भातील माहिती पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी ट्वीट करुन दिली आहे. शहरासाठी रिअल टाईमनुसार निर्णय घेण्याच्या दृष्टीकोनातून आम्ही आता मुंबईच्या प्रत्येक लेनचे 3D मॅपिंग करत आहोत. माझ्या मतदारसंघात वरळी येथे घेण्यात आलेल्या पायलट प्रोजेक्टवर काम सुरू आहे. प्रत्येक लेनवर मुंबईकरांना योग्य माहिती देण्यासाठी आम्ही हे मॅपिंग महत्त्वाचे आहे, असे ट्वीट त्यांनी केले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.