शिवसेना नेते संजय राऊत यांनी पुण्यात पाय ठेवून दाखवावा, त्यांना फिरू देणार नाही, असा इशारा भाजपने दिला होता. त्यावर शिवसेनेने प्रति आव्हान दिले होते, गणेशोत्सवानंतर संजय राऊत पुण्यात येणार आहेत, त्यांना अडवून दाखवा, आम्ही शिवसेना स्टाईलने उत्तर देऊ, असे सेनेने म्हटले होते. त्याप्रमाणे संजय राऊत रविवारी, २६ सप्टेंबर रोजी पुण्यात जाणार आहेत, राऊत पुण्यात जाऊन त्यांचा दौरा पूर्ण करणार आहेत. अशा वेळी त्यांना पुण्यात फिरू न देणाऱ्या भाजपाला सेनेच्या स्टाईलने उत्तर देऊ, असे आव्हान सेनेने दिले होते, ते आव्हान भाजप स्वीकारणार का, हे पाहावे लागणार आहे.
पुण्यात सेना-भाजप यांच्यातील शाब्दिक युद्ध कारणीभूत!
सध्या पुण्यात येऊन शिवसेना नेते संजय राऊत आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यात शाब्दिक युद्ध करतात. चंद्रकांत पाटील यांनी ‘पाठीत खंजीर खुपसणारा राज्यासमोर दुसरा चेहरा समोर आला आहे’, असे सांगत अप्रत्यक्ष मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर शिवसेना नेते संजय राऊत यांनी ‘आम्ही समोरून कोथळा काढणारे आहे’, असे वक्तव्य केले. त्यावर चंद्रकांत पाटील यांनी राऊत यांचे वक्तव्य भडकावू असून नारायण राणे यांना ज्या धर्तीवर अटक करण्यात आली होती, त्याच धर्तीवर अटक करण्यात यावी’, अशी मागणी पाटील यांनी केली होती.
(हेही वाचा : राज्य सरकारचे ‘मिशन अनलॉक’: आता थिएटर्सचे दरवाजेही उघडणार)
संजय राऊत गणेशोत्सवात पुण्यामध्ये येणार!
तसेच भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी डेक्कन पोलिस ठाण्यात संजय राऊत यांच्या विरोधात तक्रार करून गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी केली. मात्र पोलिसांनी त्याची दखल घेतली नाही. त्यामुळे मुळीक यांनी ‘जर संजय राऊत यांना अटक केली नाही, तर राऊत यांना पुण्यात पाय ठेवून देणार नाही, त्यांना पुण्यात फिरू देणार नाही’, असा इशारा दिला होता. त्यावर शिवसेनेने प्रत्युत्तर दिले आहे. ‘गणेशोत्सवानंतर संजय राऊत हे पुण्यात येणार आहे, त्यांना अडवून दाखवा, आम्ही शिवसेना स्टाईलने उत्तर देऊ’, असे प्रती आव्हान दिले होते.
Join Our WhatsApp Community