सप्ताहातील एक दिवस रविवारी उपनगरीय रेल्वे मार्गावर रेल्वे रुळांच्या डागडुजीसाठी मेगाब्लॉक घेतला जातो. त्याप्रमाणे २६ सप्टेंबर रोजीही हा मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. त्यामध्ये मध्य रेल्वेवर तब्बल १० तासांचा ब्लॉक घेण्यात आला आहे आणि तो सकाळी ८ वाजल्यापासून सुरु होणार आहे, त्यामुळे रविवारी कुणी प्रवासाचे नियोजन करणार असतील, त्यांनी मेगाब्लॉकचा विचार करण्याची गरज आहे.
कळवा आणि मुंब्रा दरम्यान पॉवर ब्लॉक
- ठाणे-दिवा पाचव्या आणि सहाव्या मार्गासाठी अप धीम्या मार्गाच्या स्लीविंगच्या संदर्भात मध्य रेल्वे रविवार, २६ सप्टेंबर रोजी सकाळी ८ ते संध्याकाळी ६ या वेळेत १० तासांचा कळवा-मुंब्रा अप धीम्या मार्गादरम्यान विशेष वाहतूक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात आला आहे. त्यामुळे या मार्गावर पुढीलप्रमाणे लोकल गाड्या चालवल्या जाणार आहेत.
- कल्याण येथून सकाळी ७.२७ ते संध्याकाळी ५.४० पर्यंत सुटणाऱ्या अप मार्गावरील धीमी/अर्धजलद उपनगरीय लोकल गाड्या दिवा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर वळवल्या जातील, पुढे मुलुंड येथे पुन्हा धीम्या मार्गावर वळवल्या जातील आणि वेळापत्रकापेक्षा १० मिनिटे उशिराने त्यांच्या नियोजित स्थानी पोहोचेल.
- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी ८ ते सायंकाळी ५ दरम्यान सुटणाऱ्या आणि सकाळी ९ ते सायंकाळी ५ पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे आगमन होणाऱ्या सर्व उपनगरीय लोकल गाड्या त्यांच्या नियोजित स्थानी वेळापत्रकापेक्षा १० मिनिटे उशिराने पोहोचतील.
- ब्लॉक सुरू होण्यापूर्वी दिवा येथून कळवा आणि मुंब्रा स्थानकांसाठी शेवटची उपनगरीय लोकल सेवा सकाळी ७.३८ वाजता असेल. ब्लॉकनंतर दिवा येथून कळवा आणि मुंब्रा स्थानकांसाठी पहिली उपनगरीय सेवा सायंकाळी ६.०२ वा. असेल.
- या ब्लॉकमुळे, काही उपनगरीय सेवा रद्द केल्या जातील परंतु प्रवाशांच्या हितासाठी विशेष गाड्या चालवल्या जातील. ब्लॉक प्रभावित भागातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांना बसची व्यवस्था करण्याचे सूचित केले आहे.
(हेही वाचा : संजय राऊत पुन्हा पुण्यात! भाजपा ‘ते’ आव्हान स्वीकारणार का?)
हार्बर मार्गावरही मेगाब्लॉक
- हार्बर मार्गावर मेगाब्लॉक सकाळी ११.४० ते सायंकाळी ४.४० या वेळेत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-चुनाभट्टी/वांद्रे डाउन हार्बर मार्गावर आणि चुनाभट्टी/वांद्रे-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अप हार्बर मार्गावर हा ब्लॉक असणार आहे.
- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई/वडाळा रोड येथून सकाळी ११.३४ ते दुपारी ४.४७ पर्यंत वाशी/बेलापूर/पनवेलला जाणारी डाउन हार्बर मार्गावरील सेवा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी ९.५६ ते सायंकाळी ४. ४३ या वेळेत वांद्रे/गोरेगावसाठी डाउन हार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील.
- पनवेल/बेलापूर/वाशी येथून सकाळी ९.५३ ते दुपारी ३.२० पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी सुटणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा आणि गोरेगाव/वांद्रे येथून सकाळी १०.४५ ते सायंकाळी ४.५८ पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी सुटणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.
- तथापि, ब्लॉक कालावधी दरम्यान पनवेल आणि कुर्ला (प्लॅटफॉर्म क्र. ८) दरम्यान विशेष सेवा चालवल्या जातील.