मराठी माणसाची कीर्ती सातासमुद्रापलीकडे पोहचली आहे. त्याच्या सोबत त्याच्या जणू पाऊलखुणा अमेरिका, ब्रिटन, ऑस्ट्रेलिया यांसारख्या प्रगत देशात उमटलेल्या आहेत. तसे अनेक साक्षी पुरावे मिळत असतात. या विकसित देशात तुम्ही कुठेही जा, महाराष्ट्रीयन रुचकर जेवण मिळणारी ठिकाणे, धार्मिक विधीचे साहित्य मिळणारी दुकाने हमखास कुठे ना कुठे दिसणार! पण यातही ज्येष्ठ क्रीडा पत्रकार सुनंदन लेले यांना लंडनमधील मँचेस्टर येथील एका आलिशान कॅफेच्या टेबलावर चक्क मराठी ग्रामीण बाज असलेले वस्तू दिसली आणि लेले यांना सुखद आश्चर्याचा धक्का बसला.
डायनिंग टेबलाच्या खुर्चीवर बाळू लोखंडे!
मँचेस्टर येथील अल्ट्रीबंकम या अतिशय सुंदर आणि दिमाखदार शहरात अनेक कॅफेटेरिया आहेत, अशाच एका कॅफेत डायनिंग टेबलच्या एका खुर्चीकडे पत्रकार लेले यांचे लक्ष गेले. त्या खुर्चीकडे पाहून कुणालाही लंडनमधून थेट महाराष्ट्रातील ग्रामीण भागामधील बाजारातील एखाद्या चहाच्या टपरीची नक्की आठवण होईल, कारण त्या कॅफेतील बहुतांश खुर्च्या ह्या लोखंडी होत्या आणि त्यातील एक खुर्ची गांजलेल्या स्थितीत होती विशेष म्हणजे त्यावर बाळू लोखंडे असे नाव लिहिण्यात आलेले होते, त्या नावाचा रंगही काही प्रमाणात निघालेला होता.
Altrincham , Manchester che बाळू लोखंडे 🤣🤔💪 आहे की नाही अजब pic.twitter.com/es5Jhe1sP6
— Sunandan Lele (@sunandanlele) September 23, 2021
स्थानिकांना लागली उत्सुकता!
लेले यांनी चक्क या खुर्चीची माहिती ट्विटद्वारे दिल्यावर त्यावर प्रतिक्रियांचा खच पडला. त्यातील एक मँचेस्टर येथील स्थानिक नागरिकाने ‘या खुर्चीवर लिहिलेल्या शब्दांचे भाषांतर काय आहे?’, अशी विचारणा केली. त्यावर लेले यांनी, ही अक्षरे मूळ मराठी भाषेतील आहेत. हे भारतीय आडनाव आहे आणि ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात आढळतात, असे उत्तर लेले यांनी दिले आहे.
Basically it’s a very original Marathi, Indian name very common so to say and that too from a rural area
— Sunandan Lele (@sunandanlele) September 23, 2021
(हेही वाचा : संजय राऊत पुन्हा पुण्यात! भाजपा ‘ते’ आव्हान स्वीकारणार का?)
कोण आहेत बाळू लोखंडे?
बाळू लोखंडे हे सांगली जिल्ह्यातील तासगाव येथील सावळज येथील मंडप डेकोरेटर आहेत. ते त्यांच्या प्रत्येक साहित्यावर स्वतःचे नाव लिहितात. आजही त्यांचा व्यवसाय सुरु आहे. साधारण १३ किलो वजनाच्या लोखंडाच्या या फोल्डिंग खुर्च्या आता ग्रामीण भागातही टाकाऊ बनल्या आहेत, त्यावर बसणेही आता कमी प्रतिष्ठेचे मानले जाऊ लागले असताना त्यातील एक खुर्ची लंडनमध्ये मात्र अँटिक पीस म्हणून दिमाखदारपणे हायफाय कॅफेत ठेवण्यात आली आणि त्यावर ‘साहेब’ चहा-कॉफी पीत असतात. ही खुर्ची लंडनपर्यंत अशी पोहचली हे मात्र गूढ आहे. कारण बाळू लोखंडे यांनी या प्रकारच्या सर्व खुर्च्या भंगारात काढल्या होत्या.
Join Our WhatsApp Community