राज्यात भाजपा-शिवसेना युतीमध्ये मिठाचा खडा पडला आणि ती तुटली. पण हा खडा नेमका कोणी घातला, यावरुन अनेकदा अनेक चर्चा होत आहेत. शिवसेनेला जे आश्वासन दिले होते, ते पूर्ण न केल्याने युती तुटली असा आरोप अनेकदा शिवसेना नेत्यांनी भाजपावर केला. पण आपण असे कुठलीही आश्वासन न दिल्याचे केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी काही महिन्यांपूर्वी सांगितले. त्यावरुन आता शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी भाजपाला गजनीची उपमा दिली आहे.
शहा गजनी, पण मुख्यमंत्री रामशास्त्री बाण्याचे
मैने ऐसे कभी बोलाही नही था, हा गजनीचा झटका भाजपाला येतो. अमित शहा गजनी असतील पण उद्धव ठाकरे हे रामशास्त्री बाण्याप्रमाणे काम करणारे नेते आमचे नेतृत्त्व करत आहेत हे लक्षात ठेवा, असं वक्तव्य सावंत यांनी एका कार्यक्रमात केले आहे. माथेरान नगरपरिषदेच्या कर्मचारी वर्गाने भारतीय कामगार सेनेच्या संघटनेत प्रवेश केला, त्यावेळी त्यांनी हे विधान केले आहे.
(हेही वाचाः अखेर भाजपाने मनसेला बिनशर्त स्वीकारले! )
युतीच्या चर्चांना उधाण
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अमित शहा यांची दिल्ली येथे रविवारी भेट घेतली. त्यावेळी या दोन्ही नेत्यांमध्ये खासगीत चर्चा झाली. त्याचवेळी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पुण्यात अजितदादांनी आमचं ऐकावं नाहीतर मुख्यमंत्री दिल्लीत गेलेच आहेत,असं विधान केलं. त्यामुळे राजकीय वर्तुळात युतीवरुन विविध चर्चा रंगल्या होत्या. पण त्यानंतर आता अरविंद सावंत यांनी भाजपासह अमित शहा यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
काय म्हणाले होते शहा?
फेब्रुवारी महिन्यात सिंधुदुर्गातील मेडिकल कॉलेजच्या उद्घाटनप्रसंगी अमित शहा सिंधुदुर्गात आले होते. त्यावेळी अमित शहा यांनी शिवसेनेवर निशाणा साधला होता.बंद दाराआड झालेल्या चर्चेदरम्यान मी काही आश्वासन दिल्याचे सांगितले जाते. मी कधीच बंद खोलीतले पॉलिटिक्स करत नाही. जे आहे ते सडेतोड बोलतो. उघड बोलतो. मी तु्म्हाला कधीच कोणतंही आश्वासन दिले नव्हते, असे विधान त्यावेळी अमित शहा यांनी केले होते.
(हेही वाचाः मविआचे मदारी डमरू वाजवतात आणि तुम्ही कोलांट्या उड्या मारता! पडळकरांचे ‘रोखठोक’ उत्तर)
Join Our WhatsApp Community