आरोग्य विभागाच्या भरती परीक्षा राज्य सरकारने अचानक रद्द केल्या, त्यामुळे मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांची गैरसोय झाली होती. त्यांचे आर्थिक नुकसान झाले. त्यामुळे मोठ्या प्रमाणात राज्य सरकारच्या विरोधात नाराजी पसरली होती. विरोधकांनी सरकारवर सडकून टीका केली होती. अखेर आरोग्य विभागाने या परीक्षांची नवीन तारीख जाहीर केली आहे.
३१ ऑक्टोबर रोजी होणार परीक्षा!
आरोग्य विभागाच्या गट-क आणि ड संवर्गातील ६ हजार २०५ पदांसाठी २५ आणि २६ सप्टेंबरला घेतली जाणारी लेखी परीक्षा ऐनवेळी पुढे ढकलण्यात आली. त्यामुळे ही परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाल्याचे दिसून आले. शिवाय, भाजपाने देखील या मुद्यावरून सरकारवर जोरादार टीका सुरू केली आहे. दरम्यान, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी या परीक्षांसंदर्भात सोमवारी, २७ सप्टेंबर रोजी महत्वपूर्ण माहिती दिली. या परीक्षांच्या नव्या तारखा निश्चित झाल्या असल्याची त्यांनी सांगितले. त्याप्रमाणे आता गट – क संवर्गाची परीक्षा २४ ऑक्टोबर आणि गट – ड संवर्गाची परीक्षा ३१ ऑक्टोबर रोजी घेण्याचा निर्णय आरोग्य विभाग व न्यासा कंपनीच्या अधिकऱ्यांमध्ये झालेल्या बैठकीत झाला आहे. या परीक्षेसाठी डॅशबोर्ड तयार करावा लागणार आहे. त्यावर सगळ्या परीक्षा केंद्रांची यादी द्यावी लागणार आहे. विद्यार्थ्यांची यादीही डॅशबोर्डवर दर्शवली गेली पाहिजे. संपूर्ण विद्यार्थ्यांची व परीक्षा केंद्रांची यादी डॅशबोर्डवर द्यावी लागणार आहे.
Join Our WhatsApp Community