आज जे काँग्रेसचे लोक दिसत आहेत, ते मेले होते, त्यांना कुणीही विचारात नव्हते. उद्धव ठाकरेंनी त्यांना सरकारमध्ये घेतले. त्यामुळे हे लोक मेलेले पुन्हा जिवंत झाले. नाहीतर त्यांच्या दोन्ही पक्षांमध्ये अशी गळती लागली होती की, कुत्रे विचारायला तयार नव्हते. सर्व सुटकेस बांधून दुसऱ्या पक्षात जायला तयार होते, असे विधान शिवसेनेचे समर्थक आमदार आशिष जयस्वाल यांनी केले. त्यामुळे महाविकास आघाडीत बिघाडी झाली आहे. पुन्हा एकदा महाविकास आघाडीत काँग्रेसला अपमान सहन करावा लागला आहे.
पुन्हा काँग्रेसचा स्वाभिमान दुखावला!
नागपूरमध्ये जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुकीच्या प्रचारादरम्यान आशिष जयस्वाल यांनी हे वक्तव्य केले आहे. जयस्वाल हे रामटेक – नागपूर येथील शिवसेना समर्थक आमदार आहेत. २०१९ मध्ये रामटेक मतदारसंघात अपक्ष म्हणून त्यांनी निवडणूक लढवली होती. नागपूरमध्ये जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुकीच्या प्रचारादरम्यान आशिष जयस्वाल यांनी हे वक्तव्य केल्याने खळबळ उडाली आहे. आधीच महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस पक्षामध्ये नाराजीचा सूर आहे. सरकारमध्ये काँग्रेसला कायम दुय्यम स्थान दिले जाते, तीन पक्षांचे सरकार असूनही त्यामध्ये काँग्रेसला कमी महत्व दिले जाते, त्यामुळे काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर होता. तशी नाराजी काँग्रेस पक्ष श्रेष्ठींनी अनेकदा व्यक्त केली होती. असा परिस्थितीत मात्र काँग्रेसचा स्वाभिमान दुखावणारे वक्तव्य शिवसेना समर्थक आमदार आशिष जयस्वाल यांनी केल्यामुळे महाविकास आघाडीत नाराजी निर्माण होणार आहे.
(हेही वाचा : जावेद अख्तर ‘हाजीर हो’: संघाबाबत केलेल्या विधानासाठी न्यायालयाकडून नोटीस)
Join Our WhatsApp Community