मराठवाड्यात पावसाचे धुमशान! ओला दुष्काळासाठी सरकारवर दबाव!

'गुलाब' चक्री वादळाचा मराठवाडा, विदर्भासह उत्तर महाराष्ट्राला जोरदार फटका बसला आहे.

123

यंदाच्या पावसाळ्यात महाराष्ट्राचे अतोनात नुकसान केले आहे. मागील काळात कोकण, पश्चिम महाराष्ट्रानंतर आता मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात अतिवृष्टीने नुकसान केले आहे. त्यामुळे या भागात मोठ्या प्रमाणात पूर्वपरिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे आता मराठवाड्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी वाढू लागली आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्य मंत्रिमंडळाने बैठक घेण्यात आली आहे. या भागात किती नुकसान झाले आहे, त्याचा राज्य सरकार आढावा घेत आहे. बुधवारी, २९ सप्टेंबर रोजी राज्य सरकारने पुन्हा यांचा आढावा घेण्यात सुरुवात केली आहे.

Rain 1

‘गुलाब’ चक्री वादळाचा मराठवाडा, विदर्भासह उत्तर महाराष्ट्राला जोरदार फटका बसला आहे. या भागात अतिवृष्टी निर्माण झाल्यामुळे या भागातील धरणे आता तुडुंब भरू लागली आहेत. जळगाव, धुळे आणि नंदुरबारमधील अनेक भागाला पावसाने झोडपून काढले आहे. तब्बल 20 मंडळामध्ये अतिवृष्टी झाली असून, चाळीसगावातल्या तितूर नदीला वर्षातला पाचवा महापूर आला आहे. पुरामुळे अनेक गावांमधील घरात पाणी शिरले आहे. हातातोंडाशी आलेला खरिपाच्या पिकाचा घास हिरावून नेला आहे. जोरदार पावसाने भागातील धरणे भरत आली आहेत.

ही धरणे भरली! 

गिरणाचा पाणीसाठा ८० टक्क्यांवर पोहचला आहे. मन्याड धरणातून पाच हजार क्यूसेक आणि जामदरा बंधाऱ्यातून पंधरा हजार क्यूसेकचा विसर्ग सुरू आहे. सोबतच या भागातले हिवरा, अग्नावती, मंगरूळ, तोंडापूर हे मध्य प्रकल्प भरले आहेत. पारोळा तालुक्यातील बोरी प्रकल्पाचे दरवाजे उघडून त्यातून ४ हजार ५९ क्यूसेकने नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. जायकवाडी धरण ९८ टक्के भरले आहे. १८ दरवाजे उघडण्यात आले आहे.  मांजर धरण भरल्याने १८ दरवाजे उघडले. गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु आहे. त्यामुळे नाशिकमधील दुतोंड्या मारुतीच्या मानेपर्यंत पाणी लागले आहे. वाघूर धरणाचे २० दरवाजे उघडले. पालघर मधील धामणी आणि कवडसा धरणातून मोठ्याप्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरु आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.