अमरिंदर सिंग नक्की आहेत कोण? नेटकरीही झाले संभ्रमित

मी अमरिंदर सिंग असून , भारतीय फुटबॅाल संघाचा गोलकीपर आहे. मी पंजाबचा मुख्यमंत्री नाही, त्यामुळे मला टॅग करणं बंद करा, अशी विनंती भारतीय फुटबॅाल संघाच्या गोलकीपरने ट्विटरवर एक पोस्ट शेअर करुन केली आहे.

133

पंजाबचं राजकारणं सध्या तापलं असून, सोशल मीडियावर त्याची जोरदार चर्चा सुरू आहे. पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी आपल्या पदावरुन राजीनामा दिल्यानंतर नेटकरी आणि मीडिया हाउस कॅप्टन अमरिंदर सिंग यांना टॅग करायचं सोडून भारतीय फुटबॅाल टीमच्या गोलकीपरला टॅग करत आहेत. त्यामुळे कंटाळून फुटबॅाल टीमच्या गोलकीपरने नेटक-यांना खास विनंती केली आहे.

पंजाबचे माजी मुख्यमंत्री जे सध्या चर्चेचा विषय बनले आहेत त्यांचं आणि भारतीय फुटबॅाल संघाचा गोलकीपर यांच नाव सेम असल्याने नेटकरी गोंधळले आणि त्यांनी मुख्यमंत्र्यांऐवजी त्याला टॅग करायला सुरूवात केली.

मी अमरिंदर सिंग असून , भारतीय फुटबॅाल संघाचा गोलकीपर आहे. मी पंजाबचा मुख्यमंत्री नाही, त्यामुळे मला टॅग करणं बंद करा, अशी विनंती भारतीय फुटबॅाल संघाच्या गोलकीपरने ट्विटरवर एक पोस्ट शेअर करुन केली आहे.

यावर पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी उत्तर देताना म्हटलं की, माझ्या तरुण मित्रा माझी सहानुभूती तुझ्यासोबत आहेत. आता सुरू होणा-या सामन्यांसाठी तुला शुभेच्छा.

सध्या भारतीय फुटबॅाल संघही चर्चेत आहे. कारण, 1 ऑक्टोबरपासून एसएएफएफ (SAFF ) चॅंपियनशिप सुरु होणार आहे. मालदीवला होणा-या या स्पर्धेत पाच संघ सहभागी होणार आहेत.

गोलकिपर अमरिंदर सिंग यांच्या ट्विटनंतर नेटकऱ्यांनी घडल्या प्रकारची चांगलीच मज्जा घेतली. यानिमित्ताने देशातील जनतेला भारतीय फुटबॉल टीमच्या गोलकिपरचे नाव समजले. काही गैरसमज चांगले असतात, असे काही जण म्हणाले.

तर काही जण म्हणाले की, ‘आता काँग्रेसचे हालही काहीसे पंजाब सारखे झाले आहेत. गोल पोस्ट रिकामे पडले आहे, परंतु कुणी गोल करायला तयार नाही.’

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.