खड्ड्यांचे प्रदर्शन नाही तर जनतेचा आवाज! आशिष शेलारांचा सत्ताधाऱ्यांना टोला

अहिंसेचे पुजारी असणाऱ्या महात्मा गांधींच्या जयंती दिवशी ठाकरे सरकारने आंदोलन करणाऱ्या भाजपा कार्यकर्त्यांवर ज्या पद्धतीने हिसेंचा मार्ग पत्करला त्याचाही त्यांनी मौन पाळून निषेध यावेळी केला.

168

सेल्फी विथ खड्डा स्पर्धा २०२१ हे प्रदर्शन भरवण्याची खरेतर वेळ येऊ नये. पण ही वेळ का आली? आज मुंबईतील दुर्दैवी चित्र जर आपण पाहिले तर भाजपा पदाधिकाऱ्यांनी जनतेचा आवाज म्हणून केलेले हे काम कौतुकास्पद असल्याचे सांगत भाजप आमदार ऍड. आशिष शेलार यांनी महापालिका मुख्यालयामसोरील खड्डे प्रदर्शनाचे कौतुक केले. अहिंसेचे पुजारी असणाऱ्या महात्मा गांधींच्या जयंती दिवशी ठाकरे सरकारने आंदोलन करणाऱ्या भाजपा कार्यकर्त्यांवर ज्या पद्धतीने हिसेंचा मार्ग पत्करला त्याचाही त्यांनी मौन पाळून निषेध यावेळी केला.

गंगुबाई गर्जे यांचा खड्डयाची चांगली सेल्फी काढल्यामुळे सन्मान

मुख्यमंत्री महोदय, जनतेच्या प्रश्नांवर लोकशाही मार्गाने अंहिसेच्या आंदोलनाला पोलिसांकडून असेच चिरडणार असाल तर यापुढे मंत्रालयात लाठ्याकाठ्या घेऊन आंदोलने करायची का?, असा सवाल भाजपा नेते आमदार आशिष शेलार यांनी केला. भाजपाच्या दक्षिण मध्य मुंबईच्यावतीने ‘सेल्फी विथ खड्डा’ स्पर्धा २०२१चे प्रदर्शन मुंबई महानगरपालिका मुख्यालयाच्या समोरील प्रांगणात घेण्यात आले. याचे उद्घाटन आमदार आशिष शेलार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी दक्षिण मध्य मुंबईचे जिल्हाध्यक्ष राजेश शिरवडकर आणि पक्षाच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे कौतुक केले. यावेळी गंगुबाई गर्जे या महिलेचा खड्डयाची चांगली सेल्फी काढल्यामुळे सन्मान करण्यात आला. माजी आमदार राज पुरोहित, तसेच नगरसेवक आकाश पुरोहित, आशा ताई मराठे, महादेव शिवगण, कृष्णवेणी रेड्डी व दक्षिण मुंबई- मध्य दक्षिण जिल्ह्याचे अनेक कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी अशाप्रकारे मुंबईतील सर्व महापालिका विभाग कार्यालयांबाहेर प्रदर्शन आगामी काळात भरविण्यात येणार असल्याचे या प्रदर्शनाचे आयोजक जिल्हाध्यक्ष राजेश शिरवडकर यांनी स्पष्ट केले. याप्रसंगी बोलतांना आशिष शेलार यांनी अंधेरी एमआयडीसीमध्ये खड्डे या विषयावर भाजपा युवा मोर्चा तर्फे जे आंदोलन करण्यात आले. त्यावर पोलिसांनी जोरदार लाठीचार्ज केला. अनेक आंदोलकांचे कपडे फाडले. या सगळ्या घटनेचा निषेध करीत आमदार आशिष शेलार यांनी शिवसेनेने हे थाबंवावे, असा इशारा दिला. बेकायदेशीर आणि चुकीचे वागणारे राज्याचे गृहमंत्री असले तरी ते आज फरार आहेत, हे विसरू नये, असा इशारा दिला.

(हेही वाचा : आशिष शेलारांच्या भ्रष्टाचाराच्या आरोपात ६०० कोटींची वाढ!)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.