मोठ्या प्रमाणात ड्रग्सचा साठा असलेल्या मुंबईहून गोव्याला जाणा-या क्रूझवर एनसीबीने शनिवारी रात्री खोल समुद्रात छापेमारी केली. यावेळी अनेक जणांना एनसीबीने चौकशीसाठी ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान मिळालेल्या माहितीवरुन एनसीबीने 8 जणांना ताब्यात घेतले असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खानचाही समावेश असल्याचे समोर येत आहे. चौकशीअंती एनसीबीकडून ही अधिकृत माहिती देण्यात आली आहे.
(हेही वाचाः कसे आले क्रूझवर ‘ड्रग्स’? जाणून घ्या संपूर्ण माहिती)
चौकशीत समोर आली माहिती
चौकशीसाठी ताब्यात घेतलेल्या सर्वांची एनसीबीकडून कसून चौकशी करण्यात येत आहे. या चौकशीदरम्यान समोर आलेल्या माहितीवरुन एनसीबीने आठ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या आठ जणांमध्ये आर्यन खान याचाही समावेश असल्याची माहिती एनसीबीने दिली आहे. यामध्ये दोन महिलांचाही समावेश आहे. गुन्हा दाखल झाला असला तरी त्यांना अजून अटक करण्यात आलेली नाही, संशयित म्हणून त्यांना ताब्यात घेण्यात आले असल्याचे एनसीबीने म्हटले आहे.
(हेही वाचाः मुंबई टू गोवा ड्रग्स क्रूझः 8 जण ताब्यात! बड्या अभिनेत्याच्या मुलाची चौकशी, म्हणाला मी…)
या 8 जणांविरोधात गुन्हा दाखल
- आर्यन खान
- नुपूर सारिका
- इस्मित सिंग
- मोहक जैस्वाल
- विक्रांत चोकेर
- गोमित चोप्रा
- मूनमून धमेचा
- अरबाझ मर्चंट