महाविकास आघाडीतील मंत्री आणि नेत्यांवर गंभीर आरोप करणारे भाजपा नेते व माजी खासदार किरीट सोमय्या यांना आता न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. शिवडी न्यायालयाने सोमय्या यांना 15 हजारांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे. तसेच गुन्हा पुन्हा न करण्याच्या अटींसह हा जामीन मंजूर करण्यात आला आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 29 नोव्हेंबर रोजी होणार आहे.
न्यायालयाने पाठवले होते समन्स
भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी काही महिन्यांपूर्वी ‘अर्थ’ या एनजीओवर गैरव्यवहाराचे आरोप केले होते. याच आरोपांबाबत सोमय्या यांना शिवडी न्यायालयाने समन्स बजावले होते. त्याबाबतची सुनावणी मंगळवार ५ ऑक्टोबर रोजी पार पडली. सोमय्या यांनी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड आणि सामाजिक कार्यकर्ते प्रविण कलमे यांच्याबाबत बदनामीकारक वक्तव्य केल्याप्रकरणी हे समन्स बजावण्यात आले होते.
(हेही वाचाः आता किरीट सोमय्यांच्या रडारवर विश्वास नांगरे-पाटील!)
सोमय्यांनी केलेले आरोप
गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी गृहनिर्माण विभाग, एसआरए तसेच म्हाडा या संस्थांमध्ये काम करणाऱ्या बिल्डरांकडून १०० कोटी रुपये वसूल करण्याचे आदेश प्रवीण कलमे यांना दिले आहेत. प्रवीण कलमे हे या सरकारी संस्थांमधील सचिन वाझे आहेत, असे आरोप किरीट सोमय्या यांनी एप्रिल महिन्यात केले होते. त्यामुळे सोमय्या यांच्याविरोधात प्रविण कलमे यांनी दोन स्वतंत्र बदनामीचे खटले न्यायालयात दाखल केले होते.
Join Our WhatsApp Community