सध्या राज्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती यांसारख्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पोटनिवडणुका निकालांकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. आगामी महापालिका निवडणुकांसाठी सगळ्याच पक्षांना आपली ताकद जोखण्याची ही एक नामी संधी आहे. त्यामुळे सगळेच पक्ष या निवडणुकांसाठी जोमाने कामाला लागले होते.
मात्र धुळे जिल्ह्यात भाजपाने पुन्हा आपले वर्चस्व कायम राखले आहे. भाजपाचे माजी मंत्री आमदार जयकुमार रावल यांनी पुन्हा शिंदखेडा तालुक्यात आपले वर्चस्व कायम राखण्यात यश मिळवले आहे. लामकानी जिल्हा परिषद गटातून चंद्रकांत पाटील यांची कन्या धरती देवरे या विजयी झाल्या आहेत.
भाजपाला बहुमत
धरती देवरे यांना भाजपाकडून उमेदवारी मिळाली होती. त्याआधी मागील निवडणुकीत त्या विनविरोध निवडून आल्या होत्या. सध्या धुळे जिल्हा परिषदेत भाजपाची सत्ता आहे. 56 पैकी 27 जागा भाजपाकडे आहेत. शिवसेना 2, राष्ट्रवादी 3 तर काँग्रेसकडे 6 जागा आहेत. धरती देवरे यांच्या विजयानंतर भाजपाला बहुमत मिळाले आहे.
असा आहे निकाल
भाजपा – 5
काँग्रेस – 00
राष्ट्रवादी काँग्रेस – 02
शिवसेना – 01
शिरपूरमध्ये पटेलांचे वर्चस्व
संपूर्ण धुळे जिल्ह्यात 65 टक्के मतदान झाले होते. त्यात शिरपूर तालुक्यातील मतदानाची टक्केवारी ही 57.12 टक्के इतकी होती. शिरपूर तालुक्यातील निवडणूक निकालांकडे सर्वांचे लक्ष लागले होते. पण अखेर अमरिश पटेल यांच्या नेतृत्त्वात भाजपाने सहाच्या सहा जागांवर कमळ खुलवले. त्यामुळे उत्तर महाराष्ट्रात हा महाविकास आघाडीसाठी मोठा धक्का मानला जात आहे.
Join Our WhatsApp Community