आता खासगी रुग्णालयांमध्येही क्षयरोग उपचार केंद्र

कोविड नियंत्रण व्यवस्थापनामध्ये जी ४३ खासगी रूग्णालये महानगरपालिका प्रशासनासमवेत कार्यरत होती, त्यांना क्षयरोग निर्मूलन – २०२५ करीता सहभागी होण्याकरीता निमंत्रित करण्यात  आल्याचे या अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी  यांनी स्पष्ट केले.

117

कोविड नियंत्रण व्यवस्थापनामध्ये जी ४३ खासगी रूग्णालये महानगरपालिका प्रशासनासमवेत कार्यरत होती, त्यांना आता क्षयरोग निर्मूलन – २०२५ करीता सहभागी होण्याकरीता निमंत्रित करण्यात आले आहे. या अंतर्गत आता हिंदुजा रूग्णालय, युनिसन मेडीकेअर, डॉक्टर्स फॉर यू, के.जे. सोमय्या रूग्णालय, सर्वोदय रूग्णालय या रुग्णालयांमध्ये औषध प्रतिरोधी क्षयरोग उपचार केंद्र उपक्रम राबविण्यात येत आहेत.

व्हिडिओ कॉन्फरन्सीद्वारे खासगी क्षेत्रातील भागीदारांसोबत बैठक

कोविड-१९ संसर्ग कालावधीत मुंबईतील नागरिकांना मुंबई महानगरपालिकेने खासगी क्षेत्रातील व्यावसायिकांच्या मदतीने विविध आरोग्य सुविधा पुरविल्या. कोविड रूग्णांना उपचार, विलगीकरण यासोबत सध्या सुरु असलेली कोविड-१९ लसीकरण मोहीम या सर्वांमध्ये खासगी क्षेत्राबरोबर महानगरपालिका प्रशासनाने भागीदारी यशस्वी करुन दाखविली. हा अनुभव पाहता, महानगरपालिकेने सन २०२५ पर्यंत क्षयरोग निर्मूलनाचे उद्दिष्ट गाठण्यासाठी खासगी रुग्णालयांना सोबत घेण्याचे ठरविले आहे. त्या दृष्टीने महापालिका अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) सुरेश काकाणी यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच व्हिडिओ कॉन्फरन्सीद्वारे खासगी क्षेत्रातील भागीदारांसोबत बैठक घेतली.

(हेही वाचा : नबाब मलिकांना ड्रग्ज माफीयांनी सुपारी दिली आहे का?)

मुंबईतील ५० टक्के क्षयरोग रुग्ण संख्या खासगी क्षेत्रातून!

कोविड नियंत्रण व्यवस्थापनामध्ये जी ४३ खासगी रूग्णालये महानगरपालिका प्रशासनासमवेत कार्यरत होती, त्यांना क्षयरोग निर्मूलन – २०२५ करीता सहभागी होण्याकरीता निमंत्रित करण्यात  आल्याचे या अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी  यांनी स्पष्ट केले. मुंबईतील ५० टक्के क्षयरोग रुग्ण संख्या खासगी क्षेत्रातून येत असल्याकारणाने खासगी क्षेत्राने क्षयरोग निर्मूलन करण्यामध्ये आपापल्या क्षमतेप्रमाणे पुढाकार घेणे महत्त्वाचे आहे. कोविड काळातील भागीदारीचा अनुभव लक्षात घेऊन महानगरपालिका व खासगी क्षेत्राने क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमात योगदान देण्याचे आवाहनही काकाणी यांनी याप्रसंगी केले. राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रम अंतर्गत कार्यरत असलेली रूग्णालये, अशासकीय संस्था, खासगी औषध प्रतिरोधी क्षयरोग उपचार केंद्रांद्वारे खासगी क्षय रूग्णांना सुविधा पुरविल्याबाबत काकाणी यांनी अभिनंदनही केले.

या रुग्णालयात उपचार केंद्र 

क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमामधील खासगी रूग्णालये यांना सहभागी होण्याकरीता उपलब्ध असलेल्या उपक्रमाची माहिती या बैठकीत दिली. हिंदुजा रूग्णालय, युनिसन मेडीकेअर, डॉक्टर्स फॉर यू, के. जे. सोमय्या रूग्णालय, सर्वोदय रूग्णालय या रुग्णालयांमध्ये औषध प्रतिरोधी क्षयरोग उपचार केंद्र उपक्रम राबविण्यात येत असल्याचे महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य खात्याच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी स्पष्ट केले. राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रम अंतर्गत उपलब्ध उपक्रमांमध्ये सहभाग घेतल्याने रूग्णांकरीता दोन नवीन औषधे उपलब्ध होतील. सदर उपक्रमांमध्ये सहभागी होण्याकरीता रूग्णालयांनी करार केल्यास विकेंद्रीकरण करण्याबाबत मदत होईल व क्षयरूग्णांना घराजवळ उपचार सुविधा उपलब्ध होतील, अशी माहितीही मुंबई शहर क्षयरोग अधिकारी डॉ. प्रणीता टिपरे यांनी दिली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.