राज्यात मुसळधार पावसाचा इशारा! ‘या’ दिवशी विजांच्या कडकडाटासह कोसळणार

140

गेल्या अनेक महिन्यांपासून राज्यावर चक्रीवादळांचे दृष्टचक्र फिरत आहे. त्यामुळे महाराष्ट्राला या वादळांचा मोठा फटका बसला आहे. गेल्या काही दिवसांत अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे मराठवाड्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यांना मोठ्या प्रमाणावर नुकसान सहन करावे लागले.

मुसळधार पावसाची शक्यता

मागच्या काही दिवसांत उसंत घेतलेला पाऊस आता पुन्हा कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. भारतीय हवामान खात्याचे शास्त्रज्ञ के. एस. होसाळीकर यांनी ट्वीट करुन याबाबत माहिती दिली आहे. पुढचे चार ते पाच दिवस वीजांच्या कडकडाटासह राज्यातील काही जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता आहे.

या जिल्ह्यांना अलर्ट जारी

नाशिक, अहमदनगर, बीड, सोलापूर, जालना, परभणी, पुणे, बुलढाणा, औरंगाबाद, सातारा, यवतमाळ, चंद्रपूर, वाशिम, कोल्हापूर, ठाणे, चंद्रपूर, लातूर, सांगली या राज्यांना येल्लो अलर्ट जारी केला आहे. हवामान विभागाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. वीजा चमकत असताना बाहेर न पडण्याचे आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आले आहे.

बुधवारी मुसळधार पाऊस

6 ऑक्टोबर रोजी कोकण किनारपट्टीवर असलेल्या अनेक जिल्ह्यांत मुसळधार पाऊस पडला. उत्तर-मध्य कोकणातील रायगड, मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांत वीजांच्या कडकडाटासह तुफान पाऊस पडला. पुढील पाच ते सहा दिवस सुद्धा मोठ्या प्रमाणावर पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.