अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या नुकसानग्रस्तांसाठी पॅकेज जाहीर

159

जुलै २०२१ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यात विविध जिल्ह्यांत पूरपरिस्थिती उद्भवली. यात शेतपिकांच्या झालेल्या नुकसानासाठी, नुकसानग्रस्तांना मदत म्हणून एकूण ३६५ कोटी ६७ लाख रुपये इतका निधी मंजूर करण्यात आला आहे. या मदतीमुळे अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. तरी सर्व कार्यान्वयन यंत्रणांनी तात्काळ मदत नुकसानग्रस्तांपर्यंत पोहोचेल याची दक्षता घेण्याचे निर्देश मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिले आहेत.

कोणत्या जिल्ह्यासाठी किती निधी

अतिवृष्टीमुळे शेतपिकांचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे नुकसानग्रस्तांना मदत म्हणून पुणे विभागासाठी १५० कोटी १२ लाख रुपये, कोकण विभागासाठी ८ कोटी ५१ लाख रुपये, अमरावती विभागासाठी ११८ कोटी ४१ लाख रुपये, नाशिक विभागासाठी १ लाख रुपये, औरंगाबाद विभागासाठी ७७ कोटी ९७ लाख रुपये, नागपूर विभागासाठी १० कोटी ६५ लाख रुपये याप्रमाणे एकूण ३६५ कोटी ६७ लाख इतका निधी मंजूर झाला आहे.

(हेही वाचाः आता राज्यात राबवलं जाणार ‘मिशन कवच कुंडल’! काय आहे योजना? वाचा)

पूरपरिस्थितीची पाहणी करुन निर्णय

अतिवृष्टीमुळे विविध जिल्ह्यात पूरपरिस्थिती उद्भवून राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये नागरिकांच्या मालमत्तेचे मोठे नुकसान झाले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,उपमुख्यमंत्री अजित पवार, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार तसेच मंत्रीमंडळातील सर्व सदस्यांनी पूरग्रस्त भागात प्रत्यक्ष जाऊन पाहणी करून तेथील शेतकऱ्याशी संवाद साधला. त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या होत्या. या अनुषंगाने महसूल व वन विभागाने निधी मंजुरीचा शासन निर्णय जारी केला आहे.

(हेही वाचाः राज्यात मुसळधार पावसाचा इशारा! ‘या’ दिवशी विजांच्या कडकडाटासह कोसळणार)

तातडीने निधी वितरित करणार

पूरपरिस्थितीमुळे शेतपिकांच्या झालेल्या नुकसानामुळे नुकसानग्रस्तांना मदतीचे वाटप करण्यासाठी राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून एकूण ३६५ कोटी ६७ लाख इतका निधी विभागीय आयुक्त यांच्यामार्फत जिल्ह्यांना वितरित करण्यास मंजुरी देण्यात आली असून, राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी तातडीने विभागीय आयुक्तांना निधी वितरित करण्याचे निर्देश दिले आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.