दादर पूर्व येथील रेल्वे स्थानकासमोरील फूटपाथ आणि पुढे दादासाहेब फाळके मार्गावरील फूटपाथवरुन चालताना पादचाऱ्यांना खूप काळजी घ्यावी लागते. चालताना जरा जरी दुर्लक्ष झाले तर ‘नजर हटी, दुर्घटना घटी’ अशी अवस्था होते.
(हेही वाचाः दादरच्या ‘त्या’ तीन रोडच्या फूटपाथकडे दुर्लक्ष का?)
या भागात मोठ्या प्रमाणात खरेदीसाठी लोक येतात. पण फूटपाथवरील तुटलेल्या लाद्यांचा अंदाज न आल्याने बऱ्याचदा पडून कपाळमोक्ष होण्याची वेळ येते. स्थानिक नगरसेविका उर्मिला पांचाळ यांना, चित्रपट महर्षी दादासाहेब फाळके यांचे नाव दिलेल्या या रस्त्याला साजेसे आणि चालण्यास योग्यप्रकारचा फूटपाथही बनवता येत नाही.
(हेही वाचाः प्रिन्सेस स्ट्रीट, दवा बाजार, लोहार चाळीत चाला पण स्त्यावरुन)
पादचा-यांचा मुरगळतो पाय
दादर पूर्व येथील दादरपासून ते हिंदमातापर्यंत जाणाऱ्या दादासाहेब फाळके मार्गाच्या दोन्ही फूटपाथची दुरावस्था झालेली असून, अनेक भागांमध्ये पेव्हरब्लॉक निखळल्याने खरेदीला येणाऱ्या ब-याच नागरिकांचा पाय मुरगळणे नाहीतर आपटून पडणे असे प्रकार घडत आहेत.
(हेही वाचाः सभागृह नेत्यांच्याच प्रभागात फूटपाथ उखडलेले)
या मार्गावरील मेहता महलपर्यंत आणि देवांश इमारतीपासून ते पुढे शिवनेरी इमारतीपासून ते हिंदमातापर्यंतच्या फूटपाथवरुन चालताना नागरिकांना मोठ्या समस्यांना तोंड द्यावे लागते. बऱ्याच दुकानांमध्ये पाहत जाणाऱ्या महिलांना निखळलेल्या पेव्हरब्लॉकची ठेच लागणे, नाहीतर पेव्हरब्लॉकच्या खचलेल्या भागातील खड्ड्यांमुळे पाय मुरगळणे, असे प्रकार घडत आहेत.
(हेही वाचाः …आणि अजित पवार धरणात अडकले!)
नागरिकांची गैरसोय
हिंदमाताच्या पुढे गोविंदजी केणी मार्गावर तर पेव्हरब्लॉकच नाहीत. तेथील पेव्हरब्लॉक काढून सिमेंट काँक्रीटची डागडुजी करुन लोकांना चालण्यास वाट मोकळी करुन दिली आहे. परंतु या मार्गावील छाया वाघमारे चौकापासून ते पुढे अपना बाजारपर्यंत फूटपाथ पूर्णपणे खोदून टाकण्यात आले आहेत. परंतु आजतागायत या फूटपाथची सुधारणा झालेली नसल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे.