आर्यनची रवानगी आर्थर रोड कारागृहात! आता सत्र न्यायालयात जाणार

आर्यनसह इतर आरोपींना ३ ते ४ दिवस क्वारंटाईन सेलमध्ये त्यांना ठेवण्यात येणार आहे.

154

बॉलिवूडचा बादशहा शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याच्या जामीन अर्जावर सुनावणी पार पडली. तेव्हा न्यायालयाने आर्यन खानचा जामीन फेटाळून लावला. त्यामुळे त्याची शुक्रवारी आर्थर रोड कारागृहात रवानगी करण्यात येणार आहे.

मुंबईत क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात आर्यन खान, अरबाज सेठ मर्चंट, मुनमुन धामेचा, विक्रांत चोकर, इस्मीत सिंग, नुपूर सारिका, गोमित चोप्रा आणि मोहक जसवाल यांना प्रथम अटक करण्यात आली. त्यानंतर न्यायालयाने या आठ जणांना ७ ऑक्टोबरपर्यंत एनसीबी कोठडी सुनावली होती. काल एनसीबीने ११ ऑक्टोबरपर्यंत कोठडीची मागणी न्यायालयात केली होती. मात्र, न्यायालयाने त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यानंतर आर्यन खानचे वकील सतीश मानेशिंदे यांनी महानगर न्यायदंडाधिकारी न्यायालयाने अंतरिम जामिनासाठी अर्ज दाखल केला. त्यावर न्यायालयात जोरदार खडाजंगी झाली. मी एका श्रीमंत कुटुंबातून आलो आहे याचा अर्थ असा नाही की, मी पुराव्याशी छेडछाड करेन, असा युक्तीवाद केला.

(हेही वाचा : आता एनसीबीच्या अधीक्षकला अटक! कारण वाचून धक्काच बसेल)

आर्यनसह आरोपींना क्वारंटाईन सेलमध्ये ठेवणार

केंद्राचे वकील अनिल सिंग यांनी ‘एका गुन्ह्यात १७ जणांचा सहभाग असलेले हे प्रकरण आहे. तपास प्राथमिक टप्प्यावर आहे. लोक किती प्रभावशाली आहेत. याचा विचार करावा लागेल. छेडछाड होण्याची शक्यता आहे. तसेच हे काही वेगळे प्रकरण नाही. जामिनाच्या स्वरूपात कोणत्याही प्रकारचे संरक्षण तपासात अडथळा आणेल, असा युक्तीवाद एनसीबीचे वकील सिंग यांनी केला. न्यायालयाने या आरोपींना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. मात्र काल कोरोनाच्या कारणास्तव एक रात्र तुरुंगाऐवजी आर्यनसह इतर आरोपींना एनसीबी कार्यालयात काढावी लागली. आज त्यांना जे जे रुग्णालयात तपासणी करून आर्थर रोड कारागृहात पाठवण्यात आले आहे. तर मुनमुन आणि नुपूर यांना भायखळा महिला कारागृहात पाठवण्यात आले आहे. आर्यनसह इतर आरोपींना ३ ते ४ दिवस क्वारंटाईन सेलमध्ये त्यांना ठेवण्यात येणार आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.