चिपी विमानतळ उद्घाटन हा विषय गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे एकाच व्यासपीठावर एकत्र आले. मात्र यावेळी राजकीय टोलेबाजी पहायला मिळाली. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आपल्या भाषणात केलेल्या टीकेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उत्तर दिले. खोटं बोलणाऱ्यांना त्यावेळी बाळासाहेब ठाकरे यांनी काढून टाकले, असे म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राणेंना टोला लगावला.
हा क्षण आदळ आपट करण्याचा नाही!
पाठांतर करुन बोलणं वेगळं, आत्मसात करुन बोलणं वेगळं, तळमळीनं बोलणं वेगळं आणि मळमळीनं बोलणं वेगळं, असा टोला त्यांनी लगावला. नजर लागू नये म्हणून काळा टीका लावावा लागतो, अशी काही लोकंही इथं उपस्थित आहेत. पण कोकणचे लोकं हुशार आहेत. ते डोळे मिटून शांत राहत नाहीत. म्हणूनच त्यांनी विनायक राऊतांना निवडून दिलं आणि मला त्यांचा अभिमान आहे. बाळासाहेबांनी खोटं बोलणा-्यांना शिवसेनेतून हाकलून लावलं, अशा शब्दात नारायण राणेंवर टीका करत नारायणराव आपण लघु उद्योग खात्याचे मंत्री आहात पण केंद्रीय मंत्री आहात. विकासकामे आपण नक्की कराल, असेही ते म्हणाले. माझ्यासाठी हा सौभाग्याचा दिवस आहे. कुठेही न झुकणा-या कोकणातील जनतेचे मस्तक हे शिवसेनाप्रमुखांसमोर झुकले, असे देखील ते म्हणाले. कुणी काय केलं आणि कुणी काय करावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. कोकणाची संपत्ती आपल्याला जगासमोर न्यायची आहे. कोकणचं कॅलिफोर्निया करु असं अनेकजण म्हणायचे. बाळासाहेब म्हणाले होते, कोकणला कॅलिफोर्नियापेक्षा भारी बनवा. कोकणच्या विकासानं आजपासून भरारी घेतली आहे. या विमानतळामुळं अनेकांना लाभ होणार आहे, असेही ते म्हणाले.
(हेही वाचा : नारायण राणे म्हणाले, उद्धवजी, जिल्ह्याचा विकास साहेबांच्या प्रेरणेतून केला!)
नाहीतर कोणतरी म्हणेल की तो किल्लाही मीच बांधला!
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आपल्या भाषणात कोकणाच्या विकासाचे शिल्पकार आपणच असल्याचा दावा केला होता. साहेबांच्या आशीर्वादानं मी मुख्यमंत्री झालो. त्यावेळी गोपीनाथ मुंडे माझे सहकारी होते. जिल्ह्यातील पुलांच्या कामासाठी 120 कोटी, पाण्यासाठी 118 कोटी दिले. आज जे इन्फ्रास्ट्रक्चर दिसतंय त्याचा उभारणीला राणेंचं योगदान आहे. दुसरा कुणी इथे येऊच शकत नाही, असे नारायण राणेंनी म्हटले होते. या टीकेला उद्धव ठाकरे यांनीही खोचक शैलीत प्रत्युत्तर दिले. मी एरियल फोटोग्राफी करत होतो. महाराजांचे किल्ले पाहिले. निदान सिंधुदुर्गाचा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधला आहे, हे माहित आहे. नाहीतर कोणतरी म्हणेल की तो किल्लाही मीच बांधला.
Join Our WhatsApp Community