काश्मीरमध्ये हिंदूंच्या हत्येचा क्रूर कट उधळून लावण्यासाठी सुरक्षा दलांचे ऑपरेशन सुरू आहे. दहशतवाद्यांनी पूछमध्ये घेराव आणि शोध मोहीमेदरम्यान अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात लष्कराचे पाच जवान हुतात्मा झाले. यावरुनच काश्मीरमधून दहशतवाद कधी संपणार, असा सवाल आता उपस्थित होऊ लागला आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
पूछ येथील डीकेजेमध्ये लष्कराने शोधमोहीम सुरू केली होती. ही कारवाई गुप्त माहितीच्या आधारावर केली जात होती. दरम्यान, दहशतवाद्यांकडून गोळीबार सुरू झाला. ज्यात लष्कराचे कनिष्ठ कमिशन अधिकारी (जेसीओ) सह पाच जवान हुतात्मा झाले. दहशतवाद्यांविरोधात चामेर जंगलात गोळीबारी सुरू असल्याचेही लेफ्टनंट कर्नल देवेंद्र आनंद यांनी सांगितले.
(हेही वाचाः चीनकडून पाकला गोंजारणे सुरुच! भारताविरुद्ध कारवायांसाठी पाकला अशी केली जात आहे मदत)
दहशतवादी घटनांमध्ये वाढ
गेल्या दोन आठवड्यांत काश्मीरमध्ये पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाच्या घटनांमध्ये अचानक वाढ झाली आहे. यामध्ये हिंदूंना निवडकपणे लक्ष्य केले गेले आहे. तसेच याशिवाय काही सामान्य लोकांना तेथे मारले गेले. आता सोमवारी चमरेर जंगलात झालेल्या चकमकीत पाच सुरक्षा कर्मचाऱ्यांची हत्या ही अलीकडच्या काळातील सर्वात मोठी घटना आहे. यामुळे काश्मीरमधील दहशतवाद कधी संपुष्टात येईल, याबद्दल चिंता व्यक्त केली जाऊ लागली आहे.
Join Our WhatsApp Community